लीडेन (नेदरलँड्स) : इराणकडून सातत्याने होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिका आणि तिची मित्रराष्ट्रे विशेषतः इस्रायल आणि आखाती देशांसमोर गंभीर लष्करी आव्हान उभे राहिले आहे. विश्लेषकांच्या मते, जर हे हल्ले दीर्घकाळ सुरू राहिले, तर पाश्चात्त्य देशांच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा साठा वेगाने संपू शकतो, तर दुसरीकडे इराणकडे अजूनही मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा साठा उपलब्ध आहे.
इराणचा अनपेक्षित प्रतिकारजर इस्रायल आणि अमेरिकेला असे वाटत असेल की इराण हल्ल्यांमुळे लवकरच शरणागती पत्करेल, तर त्यांचा हा अंदाज चुकत असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू होऊनही, इराण पश्चिम आशियातील अमेरिकेच्या विविध तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा सतत वर्षाव करत आहे.
संरक्षण यंत्रणांवरील ताणअमेरिका व तिची मित्रराष्ट्रे इराणची क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडण्यासाठी ‘थाड’ इंटरसेप्टर, पॅट्रियट मिसाइल प्रणाली आणि नौदल क्षेपणास्त्रांचा वापर करतात. इस्रायल लांब पल्ल्याच्या ‘एरो’ इंटरसेप्टर प्रणालीचा वापर करतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या यंत्रणांच्या उपलब्धतेवर प्रचंड ताण आला आहे. यातील अनेक यंत्रणा आधीच युक्रेनला देण्यात आल्या आहेत.
शस्त्रास्त्रांचा तुटवडा आणि प्राधान्यक्रमएका अंदाजानुसार, अमेरिकेचा या क्षेपणास्त्रविरोधी शस्त्रास्त्रांचा साठा चिंता करण्याच्या पातळीवर आला आहे. जून २०२५ मध्ये इराणविरुद्धच्या १२ दिवसांच्या युद्धातच अमेरिकेच्या ‘थाड’ इंटरसेप्टर साठ्यापैकी सुमारे २५% हिस्सा खर्च झाला होता. अशा परिस्थितीत, युद्धादरम्यान कोणत्या लक्ष्यांचे संरक्षण करायचे याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. सहसा धोरणात्मक लष्करी तळांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे काही नागरी भागांना नुकसान सोसावे लागू शकते.
ड्रोनचा धोका आणि जागतिक परिणामतज्ज्ञांच्या मते, इराणचे ‘शाहेद’ ड्रोन मोठे आव्हान आहेत. हे ड्रोन क्षेपणास्त्रांच्या तुलनेत स्वस्त व सोप्या पद्धतीने डागता येतात.त्याची संहारक क्षमताही अधिक आहे. इराणकडे असे सुमारे ८०,००० ड्रोन असण्याचा अंदाज आहे. हे ड्रोन इस्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा देणाऱ्या देशांवर डागण्यात येत आहे, ज्यामुळे सर्व जेरीस आले आहेत.
या संघर्षाचे संभाव्य परिणाम नक्की कोणते?ऊर्जा संकट : आखाती देशांमधील तेल आणि वायू प्रकल्पांना धोका निर्माण होऊ शकतो.व्यापार : सागरी व्यापारावर परिणाम होऊन जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉटेल्सचे नुकसान, प्रवास अवघड. लष्करी तळ : आखाती देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ इराणच्या टप्प्यात आहेत. त्यांचे चांगलेच नुकसानही होऊ शकते.
Web Summary : Iran's drone and missile attacks pose a significant challenge to US, Israel. Western air defenses face depletion as Iran maintains large stockpiles. Conflict risks energy crisis, trade disruptions, and military base damage.
Web Summary : ईरान के ड्रोन और मिसाइल हमलों से अमेरिका, इजराइल को खतरा। पश्चिमी वायु रक्षा प्रणालियाँ कमजोर, ईरान के पास बड़ा भंडार। संघर्ष से ऊर्जा संकट, व्यापार बाधाएँ, सैन्य ठिकानों को नुकसान का खतरा।