शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका सर्वात मोठा अणुबॉम्ब तयार करणार; हिरोशिमा बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:15 IST

अमेरिका हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली बॉम्ब तयार करत आहे.

वॉशिंग्टन: दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बची सर्वांनाच माहिती आहे. त्या अणुबॉम्बमुळे दोन मोठी शहरे नामशेष झाली होती. आता अमेरिका या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे. 

यूएस संरक्षण विभागाच्या घोषणेनुसार, हा B61 न्यूक्लिअर ग्रॅव्हिटी बॉम्बचे अॅडव्हान्स व्हर्जन असेल, ज्याला B61-13 असे नाव देण्यात आले आहे. हा बॉम्ब बनवण्यासाठी काँग्रेसची (संसद) मान्यता घ्यावी लागेल. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, पेंटागॉनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, B61-13 ऊर्जा विभागाच्या राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासनद्वारे तयार केला जाईल. 360 किलोटन वजनाचा B61-13 अणुबॉम्ब B61-7 ची ​​जागा घेईल, म्हणजेच अणुबॉम्बची संख्या वाढणार नाही, पण त्याचा साठा अधिक धोकादायक होईल.

जपानवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा शक्तिशालीनवीन बॉम्बच्या तुलनेत हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बचे वजन 15 किलोटन होते, तर नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचे वजन 25 किलोटन होते. सोप्या शब्दात सांगायचे तर, नवा बॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 14 पट अधिक शक्तिशाली असेल.

वाढता धोका पाहता घेतला निर्णयअंतराळ संरक्षण धोरणाचे सहाय्यक सचिव जॉन प्लंब यांनी सांगितले की, जगातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीत बदलणारे आणि वाढते धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आमच्या देशाला आणि आमच्या मित्र राष्ट्रांना खात्री देऊ इच्छितो की, आम्ही वाढत्या सुरक्षा आव्हानांबद्दल जागरूक आहोत आणि गरज पडल्यास त्यांना योग्य प्रतिसाद देण्यास सक्षमही आहोत.

टॅग्स :AmericaअमेरिकाBombsस्फोटकेJapanजपानDefenceसंरक्षण विभागInternationalआंतरराष्ट्रीय