शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचे सावट! अमेरिका-इराण तणाव वाढला; भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:20 IST

America-Iran: भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे.

America-Iran:इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने 23 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वाची सूचना (Advisory) जारी केली आहे. या सूचनेत इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना(विद्यार्थी, तीर्थयात्री, व्यापारी आणि पर्यटक) उपलब्ध सर्व साधनांचा, विशेषतः व्यावसायिक विमानसेवेचा वापर करून तातडीने इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

बदलत्या परिस्थितीचा इशारा

दूतावासाने स्पष्ट केले आहे की, 5 जानेवारी 2026 रोजी भारत सरकारने जारी केलेल्या सल्ल्याच्या पुढील टप्प्यात आणि इराणमधील बदलत्या सुरक्षास्थितीच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी उपलब्ध वाहतुकीच्या साधनांचा वापर करून देश सोडावा.

नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

याआधी 14 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनेची आठवण करून देत दूतावासाने नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे, कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांपासून दूर राहण्याचे, दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्याचे आणि प्रवास व ओळखपत्रे (पासपोर्ट, व्हिसा आदी) नेहमी तयार ठेवण्याचे आवाहन केले होते.

नोंदणी न केलेल्यांना तातडीची सूचना

दूतावासाने सांगितले आहे की, ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही, त्यांनी अधिकृत लिंकद्वारे तात्काळ नोंदणी करावी. इराणमध्ये इंटरनेट अडचणींमुळे नागरिकांना स्वतः नोंदणी करता येत नसेल, तर भारतामधील त्यांच्या कुटुंबीयांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जाहीर

कोणत्याही मदतीसाठी भारतीय दूतावासाने खालील आपत्कालीन संपर्क क्रमांक +989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359 जाहीर केले आहेत. याशिवाय नागरिक cons.tehran@mea.gov.in या ई-मेलवरही संपर्क साधू शकतात.

अमेरिकेचा अल्टीमेटम, युद्धाची भीती

ही सूचना अशा वेळी जारी करण्यात आली आहे, जेव्हा इराणच्या अणु कार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 10 ते 15 दिवसांत नवीन अणु करारासाठी तयार होण्याचा अल्टीमेटम दिला असून, अपयश आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेने मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती केली असून युद्धनौका, लढाऊ विमाने, इतर सैन्य संसाधने तैनात करण्यात आली आहेत. इराणमध्ये सध्या विरोधी आंदोलने, झडपा-झडपी आणि अस्थिरतेचे वातावरण वाढत आहे. सुरक्षा परिस्थिती नाजूक बनली असून, अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईमुळे संपूर्ण प्रदेशात युद्धाचा धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran tensions escalate; Indians advised to leave Iran immediately.

Web Summary : Amid rising US-Iran tensions, the Indian Embassy in Tehran advises Indian nationals to promptly leave Iran using commercial flight services due to escalating security concerns and potential conflict.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIndiaभारत