शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लपलेल्या हक्कानीला मारण्यासाठी अनेकदा ड्रोन हल्ले; परंतू खुलेआम दिसताच अमेरिका गप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 05:56 IST

काबूलमध्ये फिरताना दिसला हक्कानी, ३७ कोटी रुपयांचे आहे बक्षीस . खलील हक्कानीने पाकिस्तानातून दहशतवादाचे जाळे विणले आहे. त्याने तालिबानला कायम साथ दिली आहे.

काबूल : अफगाणिस्तानतालिबान्यांच्या ताब्यात गेल्यानंतर काही मोस्ट वाँटेड दहशतवादी बिळातून बाहेर निघू लागले आहेत. अमेरिकेला हवा असलेला दहशतवादी खलील हक्कानी हा काबूलमध्ये नारेबाजी करताना दिसून आला. खलील हक्कानीवर अमेरिकेने ३७ कोटी रुपयांचे बक्षीसही ठेवले आहे. असा हा हक्कानी केवळ काही किलोमीटर अंतरावर होता. मात्र, अमेरिकन सैन्याला कोणतीही कारवाई करता आली नाही. 

खलील हक्कानीने पाकिस्तानातून दहशतवादाचे जाळे विणले आहे. त्याने तालिबानला कायम साथ दिली आहे. अमेरिकेने अनेकदा ड्रोन हल्ल्यांमधून हक्कानीच्या अड्ड्यांवर हल्ले केले आहेत. आज अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येताच हक्कानी बाहेर मोकाट फिरताना दिसला. काबूलमधील सर्वात मोठ्या मशिदीच्या इमामांसोबत खलील हक्कानीने चर्चा केली. त्यानंतर बाहेर येऊन त्याने काबूलच्या रस्त्यांवर नारेबाजी केली. या हक्कानीला अमेरिकेने २०११ मध्ये जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. त्याने अल-कायदासोबतही काम केले आहे. तो आता तालिबानची भाषा बोलू लागला आहे. तो म्हणाला की, तालिबान देशाला सुरक्षा देईल. महिला आणि पत्रकारांना घाबरण्याची गरज नाही. कोणासोबतही भेदभाव होणार नाही. 

सशस्त्र सुरक्षारक्षकांचा हक्कानीला गराडाnहक्कानीच्या सुरक्षेमध्ये तालिबानी सैनिकही होते. हेल्मेट आणि नाइट व्हीजन गॉगल्ससह अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याकडे होती. nअमेरिकन सैन्यापासून तो अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होता. मात्र, त्याला हातदेखील लावता आला नाही. 

‘२० वर्षांमध्ये कमावलेले सर्व काही संपले’nअफगाणिस्तानचे खासदार नरेंद्रसिंग खालसा हेदेखील या नागरिकांमध्ये होते. एका गुरुद्वारामध्ये अजूनही २८० शीख बांधव अडकले असून त्यांनाही मदत करण्याची विनंती खालसा यांनी भारत सरकारकडे केली आहे.nअफगाणिस्तानमधून भारतात आल्यानंतर शीख खासदार नरेंद्र सिंह खालसा यांना अश्रू अनावर झाले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. nते म्हणाले की, मला तिथली परिस्थिती पाहून रडायला येत आहे. ज्या अफगाणिस्तानात आम्ही अनेक पिढ्यांपासून राहत आहोत, तिथे अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितली नव्हती. आता परिस्थिती खूपच गंभीर आहे. सर्व संपले असून आता शून्य झाले आहे, असे नरेंद्र सिंह खालसा यांनी सांगितले.

टॅग्स :AmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान