शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:02 IST

America Attack On Iran: मेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बोलावण्यात आलेल्या आपातकालीन बैठकीमध्येही याचे पडसाद उमटले. तसेच यामध्ये रशिया आणि चीन या अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली.

अमेरिकेने काल इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच अमेरिकेने उचललेल्या या पावलावर अनेक देशांकडून टीका होत आहे. अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बोलावण्यात आलेल्या आपातकालीन बैठकीमध्येही याचे पडसाद उमटले. तसेच यामध्ये रशिया आणि चीन या अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. रशिया, चीन आणि पाकिस्तानने १५ सदस्यीय परिषदेमध्ये एक मसुदा सादर करून, पश्चिम आशियामध्ये तातडीने युद्धविराम घोषित करण्याची मागणी केली.

अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा रशिया आणि चीनने तीव्र शब्दात निषेध केला आहे. चीनचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत फू कोंग म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये बळजबरीने शांतता प्रस्थापित करता येणार नाही. सद्यस्थितीत संवाद आणि चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा निघू शकतो. इराणच्या आण्विक प्रश्नावर मुत्सद्देगिरीचा मार्ग अद्याप संपुष्टात आलेला नाही. तसेच शांततेचा मार्ग अद्यापही खुला आहे.

तर रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत वासिली नेबेजिया यांनी या हल्ल्याची तुलना २००३ इराक युद्धाशी केली. ते म्हणाले की, पुन्हा एकदा आपल्याला अमेरिकेच्या काल्पनिक कहाण्यांवर विश्वास ठेवण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील लाखो लोकांना त्रासाचा सामना करावा लागेल. अमेरिकेने भूतकाळातून काहीच धडा घेतलेला नाही, हेच यावरून सिद्ध होत आहे, असा टोलाही रशियाकडून लागवण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस या बैठकीच्या सुरुवातीला म्हणाले होते की, इराणच्या अणुकेंद्रावर अमेरिकेने केलेला हल्ला हे एक धोकायदायक वळण आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर त्वरित चर्चा करण्यासाठी आपण त्वरित आणि निर्णायक कारवाई केली पाहिजे.

तर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील कार्यवाहक राजदूत डोरेथी शिया यांनी सांगितले की, आता निर्णायक कारवाईची वेळ आली आहे. इराणने इस्राइलला संपवण्याचे आणि अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने इराणला सांगावे, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच इराण दीर्घकाळापासून आपला आण्विक कार्यक्रम लपवत आहे, असा दावाही त्यांनी केला.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघUnited StatesअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलrussiaरशियाchinaचीन