अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे - डोनाल्ड ट्रम्प

By Admin | Updated: March 19, 2016 15:11 IST2016-03-19T15:11:13+5:302016-03-19T15:11:13+5:30

गतवैभव गमावलेला अमेरिका हा आता दरिद्री देश झाला असून मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे

America has become a poor country - Donald Trump | अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे - डोनाल्ड ट्रम्प

>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 19 - गतवैभव गमावलेला अमेरिका हा आता दरिद्री देश झाला असून मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या ते प्रचार करत आहेत. 
तुम्ही दुबई आणि चायनामधले रस्ते आणि पायाभूत सुविधा बघा आणि न्यूयॉर्क बघा. अमेरिका तुम्हाला 100 वर्षे जुनं वाटेल असं ट्रम्प म्हणाले.
तिसऱ्या जगातल्या देशांच्या पंक्तीत अमेरिका आल्याचं सांगत, मी अमेरिकेला पुन्हा उर्जितावस्थेत आणिन असा दावा त्यांनी केला आहे. इस्लामिक स्टेटला संपवणं आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा तेजीत आणणं ही दोन कामं आपण निश्चित करू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: America has become a poor country - Donald Trump