शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 11:41 IST

" गेल्या ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत अमेरिकेने मध्य पूर्वेतील संघर्षावर $22.76 अब्ज (रु. 18,47,15,19,00,000) एवढा खर्च केल्याचे समोर आले आहे."

गेल्या वर्षी इस्रायल आणि हमास युद्ध पेटले. यानंतर लगेचच अमेरिकेने तेल अवीवला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पाठवायला सुरुवात केली. याशिवाय, बायडेन प्रशासनाने मध्यपूर्वेतील आपल्या ठिकानांवर कॅरिअर स्ट्राइक ग्रुप, लढाऊ विमानांचे स्क्वाड्रन्स, एअर डिफेन्स सिस्टिम आणि सैन्य वाढवले. यानंतर आता, एका वर्षानंतर, ब्राउन युनिव्हर्सिटीच्या कॉस्ट ऑफ वॉर प्रोजेक्टचा एक नवा अहवालात समोर आला आहे. यात, गेल्या ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत अमेरिकेने मध्य पूर्वेतील संघर्षावर $22.76 अब्ज (रु. 18,47,15,19,00,000) एवढा खर्च केल्याचे समोर आले आहे.

इस्रायलला एकाच वर्षात केली 22.76 बिलियन डॉलरची मदत - या मदतीत 17.9 अब्ज डॉलर इस्रायलला सुरक्षा सहाय्याता म्हणून देण्यात आले आहेत. तर4.86 अब्ज डॉलर संपूर्ण प्रदेशात अमेरिकेची तैनाती वाढवण्यासाठी खर्च करण्यात आले. या खर्चामध्ये येमेनच्या हुथींविरुद्ध अमेरिकेच्या लष्करी मोहिमेच्या खर्चाचाही समावेश आहे. विद्यापीठानुसार, 7 ऑक्टोबर, 2023 पासून 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत या संकटासंदर्भातील इतर खर्चाचा समावेश नाही. जसे की, लाल समुद्रात हुतींच्या आंशिक नाकेबंदीमुळे जागतिक शिपिंगच्या खर्चात झालेली वाढ.

अमेरिकेने इस्रायलला केली सर्वाधिक मदत -संबंधित अहवालानुसार, अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या शस्त्रांस्त्रांमध्ये जवळपास 57,000 तोफगोळे, तोफांसाठी 36,000 राउंड दारू-गोळा, 20,000 M4A1 रायफल्स, 14,000 अँटी-टँक मिसाइल्स, 8,700 MK 82 500 पाउंड बॉम्बचा समावेश आहे.

एयर डिफेंस सिस्टिमसाठीही कोट्यवधी डॉलर -याशिवाय अमेरिकेने इस्रायलला, आयर्न डोम आणि डेव्हिड स्लिंग एअर डिफेन्स सिस्टमसाठी 4 अब्ज डॉलर आणि आयर्न बीम लेझर एअर डिफेन्स सिस्टमसाठी 1.2 अब्ज डॉलरची मदत केली आहे. एवढेच नाही, तर अमेरिकन शस्त्रागार पुन्हा भरण्यासाठीही 4.4 अब्ज डॉलर दिले आहेत.

या घातक शस्त्रास्त्रांनी भरली आहेत गोदामं - अमेरिकेच्या मदतीमध्ये 4,127,000 किलोग्रॅम जेपी-8 जेट इंधन, 14,100 एमके 84 अनगाइड 2,000 बॉम्ब, 3,000 जॉइंट डायरेक्ट अटॅक म्युनिशन डंब-टू-स्मार्ट बॉम्ब ट्रान्सफॉर्मर किट, 3,000 हेलफायर मिसाइल, 2,600 250-पाउंड जीबीयू-39 छोट्या आकाराचे बॉम्ब, 1,800 एम141 बंकर बस्टर बॉम्ब, 3,500 नाइट व्हिजन डिव्हाइस, 200 स्विचब्लेड ड्रोन, 100+ स्कायडियो एक्स ड्रोन आणि 75 ज्वाइंट लाइट टॅक्टिकल वाहनांचाही समावेश आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलwarयुद्ध