अमेरिका गोठली

By Admin | Updated: November 20, 2014 01:37 IST2014-11-20T01:37:31+5:302014-11-20T01:37:31+5:30

अमेरिकेत थंडीची त्सुनामी आली असून सर्व ५० राज्यातील तापमान गोठणबिंदू किंवा त्याहूनही खाली घसरले आहे.

America frozen | अमेरिका गोठली

अमेरिका गोठली

न्यूयॉर्क : अमेरिकेत थंडीची त्सुनामी आली असून सर्व ५० राज्यातील तापमान गोठणबिंदू किंवा त्याहूनही खाली घसरले आहे. प्रचंड हिमवृष्टीने पश्चिम न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी लागू करणे भाग पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तर धु्रवावरून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे अमेरिकेचा दक्षिण भाग विक्रमी थंडीला सामोरा जात आहे. हवाईसह सर्व अमेरिकी राज्ये गोठणबिंदू किंवा त्याहून खाली घसरलेल्या तापमानाने सर्द झाली आहेत, असे राष्ट्रीय हवामान सेवेने (एनडब्ल्यूएस) म्हटले आहे.
१९७६ नंतर देशातील आजची सकाळ ही सर्वात थंड होती. ही थंडी अवकाळी आहे. सामान्यपणे डिसेंबर अखेरपर्यंत अशी थंडी पडत नसते.
पश्चिम न्यूयॉर्कमधील एरि काऊंटीत ६० इंच हिमवृष्टी झाली असून ती अद्यापही सुरूच आहे. प्रतितास पाच इंच एवढ्या प्रचंड वेगाने बर्फवृष्टी होत असून २४ तासांत ती ७० इंचापर्यंत जाऊ शकते, असे एनडब्ल्यूएसचे स्टीवन वेल्च यांनी सांगितले. गोठून टाकणाऱ्या थंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: America frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.