शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
4
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
5
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
6
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
7
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
8
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
9
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
10
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
11
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
12
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
13
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
14
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
15
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
16
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
17
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
18
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
19
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
20
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...

बाबो! ३ हजार डायनामाइट लावून काही सेकंदात उडवला ट्रम्प यांचा ३४ मजली प्लाझा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 13:02 IST

Trump Plaza In Atlantic City Is Demolished : हा ट्रम्प प्लाझा (Trump Plaza) १९८४ मध्ये बांधण्यात आला होता आणि २०१४ मध्ये याला बंद कऱण्यात आलं होतं. वादळांमुळे या इमारतीचा बाहेरचा भाग खराब झाला होता.

Trump Plaza In Atlantic City Is Demolished : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांचा प्लाझा हजारो डायनामाइटच्या मदतीने पाडण्यात आला आहे. अमेरिकेतील अटलांटिक(Atlantic) शहरातील हा प्लाझा आपल्या कसीनोसाठी लोकप्रिय होता. ३ हजार डायनामाइटच्या मदतीने ३४ मजल्यांची ही इमारत पाडताना बघण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली होती.

हा प्लाझा १९८४ मध्ये बांधण्यात आला होता आणि २०१४ मध्ये याला बंद कऱण्यात आलं होतं. वादळांमुळे या इमारतीचा बाहेरचा भाग खराब झाला होता. ज्यामुळे गेल्यावर्षी जूनमध्ये मेअर मार्टी स्मॉलने ही बिल्डींग पाडण्याचा आदेश दिला होता. जेव्हा ही बिल्डींग पाडण्यात आली तेव्हा तिथे शेकडो लोक उपस्थित होते. इतकंच नाही तर याचं लाइव्ह स्ट्रीमिंगही करण्यात आलं होत.

हा प्लाझा पाडतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३४ मजली ही विशाल इमारत पाडण्यासाठी केवळ २० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. बुधवारी सकाळी ९ वाजता एकापाठी एक विस्फोटानंतर ही इमारत पाडली गेली. अटलांटिक शहरचे मेअर म्हणाले की, इमारत पाडल्यानंतर याचा मलबा ८ मजली इमारती एवढा आहे आणि तो हटवण्यासाठी जून पर्यंतचा वेळ लागेल.

ट्रम्प स्वत: काही हॉलिवूड सिनेमात दिसले आहेत. त्यांचा हा प्लाझाही अनेक सिनेमात दिसला आहे. ओशन ११ सिनेमाचं शूटींग ट्रम्प प्लाझामध्ये करण्यात आलं होतं. १९८४ ते १९९१ पर्यंत या कसीनोचे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करणारे बर्न डिल्लन म्हणाले की, 'ज्याप्रकारे ट्रम्प प्लाझा आणि अटलांटिक सिटीला जगसमोर ठेवलं तो क्षण अविश्वसनिय होता'.  या प्लाझामध्ये पॉप सुपरस्टार मेडोनापासून ते रेसलर हल्क होगन, म्युझिक लिजंड कीथ रिचर्ड्स, अभिनेता जॅक निकलसनसारखे लोकही येऊन गेलेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल