शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

निरोपाच्या संदेशात मेलेनिया ट्रम्प यांचं संसद हिंसाचारावर वक्तव्य; म्हणाल्या,"हिंसाचाराचा आधार..."

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 11:20 AM

काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडवला होता हिंसाचार

ठळक मुद्देट्रम्प समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संसद परिसरात घडवला होता हिंसाचारउद्या जो बायडेन घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये जो बायडेन यांना बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर येत्या २० जानेवारीला म्हणजेच उद्या ते आणि कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर औपचारिकरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागणार आहे. निवडणुकांच्या निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेच्या परिसरात हिंसाचार घडवला होता. याच हिंसाचाराचा उल्लेख फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी आपल्या निरोपाच्या संदेशात केला. लोकांनी प्रत्येक बाबतीत उत्साही असावं. परंतु हिसाचाराचा आधार कधीही घेतला जाऊ नये, असं त्या म्हणाल्या. मेलेनिया ट्रम्प यांनी व्हिडीओद्वारे आपला निरोपाचा संदेश अमेरिकेतील नागरिकांना दिला. "आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी उत्साही असलं पाहिजे. परंतु हिंसाचार हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हिंसाचार कधीही योग्य ठरवला जाऊ शकत नाही," असं मेलेनिया ट्रम्प म्हणाल्या. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा संदेश जारी केला आहे. संसद परिसरात हिंसाचारजगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा तो दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती.अमेरिकी संसदेत मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पMelania Trumpमेलेनिया ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसUSअमेरिकाUS ElectionAmerica ElectionUS Riotsअमेरिका-हिंसाचार