शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:01 IST

America Attack on Iran : अणुबॉम्ब हा केवळ इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने केलेला बहाणा आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्यामागचा खरा हेतू काही वेगळाच असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

इस्राइल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, आज अमेरिकेने अमेरिकेने  पहाटेच्या सुमारास इराणमधील तीन अणुकेंद्रांना लक्ष्य करून जोरदार हल्ला  केला. या हल्ल्यात इराणच्या अणुकेंद्रांचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असल्याचा दावा करत आधी इस्राइल आणि आता अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केले आहे. मात्र अणुबॉम्ब हा केवळ इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने केलेला बहाणा आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्यामागचा खरा हेतू काही वेगळाच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. दरम्यान, हा असा भाग आहे जिथून जगाच्या एकूण खनिज तेलाच्या उत्पन्नापैकी २६ टक्के खनिज तेल मिळतं. सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती यां जगातील आघाडीच्या १० खनिज तेल उत्पादक देशांमध्ये समावेश होतो. मात्र इस्राइल आणि इराणमधील संघर्षामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्बचं कारण दिलं असलं तरी इराणमध्ये मुबलक प्रमाणात असलेले खनिज तेलाचे साठे हेही या हल्ल्यामागचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

मध्य पूर्वेतील इतर आखाती देशांप्रमाणेच इराणमध्येही खनिज तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. इराणमधून दररोज ३.३ दशलक्ष बॅरल एवढं खनिज तेल उत्पादित केलं जातं. इराण दररोज २ दशलक्ष बॅरल खनिज तेल आणि शुद्धिकरण केलेल्या तेलाची निर्यात करतो. तसेच त्यामधून इराणची अर्थव्यवस्था चालते. दरम्यान, इराणवर अणुबॉम्बच्या संशयावरून हल्ला करणाऱ्या डोनाल्ड ट्र्म्प यांची नजर या खनिज तेलाच्या साठ्यांवर असण्याची शक्यता आहे. इराणमध्ये आपल्याला हवं तसं सत्तांतर घडवून तिथल्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा हेतू असू शकतो.

आखाती देशांमधील बहुतांश भाग हा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे आपलं तिथलं वर्चस्व भक्कम करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. एवढंच नाही तर इराणमध्ये वर्चस्व प्रस्थापित करून चीन आणि रशियाला कमकुवत करण्यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराण