शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 16:32 IST

अमेरिकेने चीनच्या शत्रूला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेने चीनचा शत्रू असलेल्या फिलिपिन्सला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे. अमेरिका आणि फिलिपिन्स यांच्यात झालेला हा व्यवहार एकूण 2.5 बिलियन डॉलरहून अधिकचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या फिलिपिन्स चीनच्या आक्रामक नीतीचा सामना करत आहे. यामुळेच, दक्षीण चीन समुद्रात चीनसोबत युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी म्हटले होते. (America approves sale of f-16 fighter jets missiles to the philippines against war with china)

बऱ्याच दिवसांपासून मल्टीरोल लढाऊ विमानांच्या शोधात होता फिलिपिन्स -फिलिपिन्स बऱ्याच दिवसांपासून एका नव्या मल्टीरोल फायटर एयक्राफ्टच्या शोधात होता. यासाठी त्याने अमेरिकेच्या एफ-16 (General Dynamics F-16 Fighting Falcon) आणि साबच्या ग्रिपिन (Saab JAS 39 Gripen)ला शॉर्टलिस्ट केले होते. कारण शस्त्रांची खरेदीदेखील आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीअंतर्गतच केली जाते. अखेर, अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिनच्या लढाऊ विमानांना प्राधान्य देण्यात आले.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

12 एफ-16 लढाऊ विमानांच्या विक्रीला मंजुरी -पेंटागॉनने म्हटले आहे, की फिलिपिन्सने लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केलेले 10 F-16C ब्लॉक 70/72 विमान आणि दोन F-16D ब्लॉक 70/72 विमान मागितले होते. 2.43 बिलियन डॉलरच्या या पॅकेजमध्ये लढाऊ विमानाचे पार्ट्स आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे. या डीमध्ये F-16 च्या विक्रीत उपकरणांच्या एका मोठ्या यादीचाही समावेश आहे. यात स्पेअर इंजीन, अॅडव्हाँस्ड इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड एरे (AESA) रडार, टॅक्टिकल कंप्यूटर, AMRAAM मिसाईल, मिसाईल लॉन्चर, स्नायपर टार्गेटिंग पॉड्स, एक इलेक्ट्रॉनिक वारफेअर सूट, दोन डझनहून अधिक शस्त्रांचा समावेश आहे. 

दोन विध्वंसक मिसाईल्सचीही विक्री करतोय अमेरिका -पेंटॉगनने गुरुवारी काँग्रेसला फिलिपिन्सला दोन मिसाईल पॅकेजच्या संभाव्य विक्रीसंदर्भातही माहिती दिली. यात पहिल्या 12 च्या संख्येत हार्पून एअर लॉन्च ब्लॉक II मिसाईल आहे. या पॅकेजमध्ये दोन प्रशिक्षण मिसाइल्स, पार्ट्स आणि बोइंगच्या तयार करण्यात आलेल्या उपकरणांचाही समावेश आहे. या पॅकेजची किंमत 120 मिलियन डॉलरपर्यंत होती. दुसरी डील दुसरा 24 AIM-9X Sidewinder Block II टॅक्टिकल मिसाइलसंदर्भात करण्यात आली आहे. ही डील 42.4 मिलियन डॉलरमध्ये झाली आहे.

व्हाइटसन रीफवरून चीनसोबत तणाव -चीन आणि फिलिपिन्स यांच्यात व्हाइटसन रीफवरून वाद आहे. संपूर्ण दक्षीण चीन समुद्रावर चीन दावा करतो. यात व्हाइटसन रीफचाही समावेश आहे. तर, हे रीफ आपले अभिन्न अंग आहे, असे  फिलिपिन्स म्हणतो. काही दिवसांपूर्वीच व्हाइटसन रीफजवळ चीनचे जवळपास 250 जहाज दिसून आले होते. हे जहाजं चिनी पिपल्स लिब्रेशन आर्मी मिलिशियाशी संबंधित होते. 

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीनsouth china seaदक्षिण चिनी समुद्रUSअमेरिकाUnited Statesअमेरिका