शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रोड Accident नंतर घटनास्थळी पोहोचली अ‍ॅम्बुलन्स, ड्रायव्हरला आढळून आला मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:48 IST

Ambulance Driver Found His Son Dead: ही घटना इंडोनेशियातील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एक अपघात झाला आणि एका व्यक्तीने जवळच्या अॅम्बुलन्सला सूचित केलं की, त्यांनी लवकर घटनास्थळी पोहोचावं.

Ambulance Driver Found His Son Dead: अनेकदा अशा काही घटना बघायला किंवा ऐकायला मिळतात, ज्यानंतर जीवन काय आहे आणि याचा अर्थ काय आहे याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. एक अशीच घटना समोर आली आहे ज्यात एका मुलाचा मृतदेह त्याच्या बापासमोर पडला होता. या मुलाचा मृत्यू एका रोड अपघातात झाला होता. 

मुलाची बाइक उभी होती

ही घटना इंडोनेशियातील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एक अपघात झाला आणि एका व्यक्तीने जवळच्या अ‍ॅम्बुलन्सला सूचित केलं की, त्यांनी लवकर  घटनास्थळी पोहोचावं. एक अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर लगेच अ‍ॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचला. तो जसा तिथे पोहोचला समोर जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. तिथे त्याचा मुलाचा मृतदेह पडून होता.

ड्रायव्हर घटनास्थळी पोहोचताच तो लगेच गाडीतून खाली उतरला आणि अपघाताच्या ठिकाणी गेला. काही लोक मृतदेहाच्या आजूबाजूला उभे होते. जेव्हा अ‍ॅम्बुलन्सचा ड्रायव्हर तिथे पोहोचला तर त्याला दिसलं की, मृतदेह दुसऱ्या कुणाचा नसून त्याच्या मुलाचाच आहे. याचा अंदाज तुम्ही लावू शकता की, तेव्हा त्याच्या मनात काय सुरू असेल.

रिपोर्ट्सनुसार, हा अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर इंडोनेशियातील एका मेडिकल संस्थेत ड्रायव्हरचं काम करतो. या ड्रायव्हरला 6 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता एका अपघाताची सूचना मिळाली होती. इमरजन्सी कॉलमुळे तो लगेच घटनास्थळी पोहोचला. ड्रायव्हर जेव्हा घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याने आपल्या मुलाची तिथे असलेली बाइक ओळखली. त्यानंतर मृतदेहाजवळ गेला.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाAccidentअपघात