शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 11:09 IST

Alpha Beta Double Variant Infection: जीनोम सीक्वेंसिंगद्वारे झाली डबल व्हेरिएंटची ओळख, भारतात अशा चाचण्यांची संख्या फार कमी

ठळक मुद्देभारतात कोरोनाचे डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्ब्डा आणि कप्पासारखे व्हेरिएंट आधीपासूनच अॅक्टीव्ह आहेत.

बेल्जियममधील आल्स्तो शहरात एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे, त्या महिलेच्या शरीरात एकाचवेळी दोन कोरोना व्हेरिएंट असल्याच समोर आलं आहे. संबंधित महिला एकाचवेळी शरीरात दोन कोरोना व्हेरिएंट असलेली जगातील पहिली रुग्ण होती. डॉक्टरांना त्या महिलेच्या शरीरात कोरोनाचे 'अल्फा' आणि 'बीटा' व्हेरिएंट आढळले होते. या दोन्ही व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं "व्हेरिएंट ऑफ कन्सर्न" जाहीर केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महिला रुग्णालयात आली होती. तिचा श्वास व्यवस्थित सुरू होता, ऑक्सीजन लेव्हलही 94% पेक्षा जास्त होती. पण, तिला नीट चालता येत नव्हतं, चालताना ती कोसळू लागली. डॉक्टरांनी तिची चाचणी केल्यानंतर तिच्या शरीरात कोरोनाचे दोन व्हेरिएंट असल्याचं समोर आलं. काही तासानंतर त्या महिलेचं फुफ्फुस अचानक खराब होण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले, पण पाचव्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दोन व्हेरिएंटचे इंफेक्शन असलेली जगातील पहिलीच रुग्ण होती. वैज्ञानिक याला कोरोनाचा नवीन प्रकार म्हणत आहेत.

भारताला जास्त सतर्क राहण्याची गरजमागच्या शनिवारी यूरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रो-बायोलॉजी अँड इंफेक्शियस डिजीजमध्ये वैज्ञानिकांनी या नवीन प्रकारावर चर्चा केली. या डबल व्हेरिएंटबाबत जगाला सतर्क करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी मांडले आहे. डबल व्हेरिएंटचे हे प्रकरण भारतासाठी जास्त महत्वाचे आहे. कारण आपल्या देशात डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्ब्डा आणि कप्पासारखे कोरोनाचे व्हेरिएंट आधीपासूनच अॅक्टीव्ह आहेत. तसेच, नवीन व्हेरिएंटची माहिती घेण्यासाठी लागणाऱ्या जीनोम सीक्वेंसिंगमध्ये भारत खूप मागे आहे. त्यामुळे भारताला या नवीन प्रकारावर जास्त लक्ष्य देण्याची गरज आहे.

दोन व्यक्तींकडून आले इंफेक्शनयूरोपियन काँग्रेस ऑफ इंफेक्शियस डिजीजमध्ये या प्रकरणावर रिपोर्ट बनवणाऱ्या डॉ. ऐनी वेंकीरबर्गेन सांगतात की, महिलेच्या शरीरात अल्फा आणि बीटा व्हेरिएंट आढळले होते. या दोन्ही व्हेरिएंटचा बेल्जियममध्ये संसर्ग वाढला आहे. त्यामुळे, दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून महिलेला इंफेक्शन झाल्याचे नाकारता येत नाही. तसेच, ऐनी यांच्यासह इतर अभ्यसकांच्या मते, जीनोम सीक्वेंसिंग वाढवल्यानंतर अशाप्रकारचे अजून रुग्ण आढळून येतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसInternationalआंतरराष्ट्रीय