हल्लेखोराचा आयफोन केला अनलॉक
By Admin | Updated: March 30, 2016 02:26 IST2016-03-30T02:26:56+5:302016-03-30T02:26:56+5:30
सन बर्नार्डिनोच्या हल्लेखोरांपैकी एकाने वापरलेला आयफोन एफबीआयने अनलॉक केला आहे. त्यामुळे अॅपलसोबत सुरू असलेली कायदेशीर प्रक्रियाही संपली आहे.

हल्लेखोराचा आयफोन केला अनलॉक
लॉस एंजिलिस : सन बर्नार्डिनोच्या हल्लेखोरांपैकी एकाने वापरलेला आयफोन एफबीआयने अनलॉक केला आहे. त्यामुळे अॅपलसोबत सुरू असलेली कायदेशीर प्रक्रियाही संपली आहे.
एका हल्लेखोराचा हा आयफोन अनलॉक करण्यासाठी अमेरिकेच्या सरकारची मदत करण्यास अॅपलने नकार दिला होता. डिजिटल सुरक्षा आणि खासगी प्रकरणात हस्तक्षेप यावर प्रभाव पडेल, असे कारण अॅपलने दिले होते. अॅपलच्या या निर्णयाचे गुगल आणि फेसबुकसारख्या समूहांनी स्वागत केले होते. या प्रकरणी न्यायालयात याच महिन्यात पुढील सुनावणी होणार होती. (वृत्तसंस्था)