सार्कोझी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

By Admin | Updated: July 3, 2014 05:26 IST2014-07-03T05:08:59+5:302014-07-03T05:26:05+5:30

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार व न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेपाचा आरोप ठेवण्यात आला

The allegations of corruption against Sarkozy are about corruption | सार्कोझी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

सार्कोझी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

पॅरिस : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार व न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेपाचा आरोप ठेवण्यात आला. गुन्हेगारी चौकशीतील हे नाट्यमय वळण त्यांच्या राजकारणात परतण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकते. सार्कोझी यांची १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर आरोप ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सरकारी वकिलांनी सांगितले. गुन्हेगारी प्रकरणात फ्रान्सच्या एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला अटक केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: The allegations of corruption against Sarkozy are about corruption