दहशतवाद्यांनी जाळले अख्खे गाव; २००० ठार?
By Admin | Updated: January 9, 2015 02:10 IST2015-01-09T02:10:41+5:302015-01-09T02:10:41+5:30
नायजेरियातील बागा गावावर बोको हराम दहशतवाद्यानी एकापाठोपाठ दोन हल्ले चढविले असून, संपूर्ण गाव जाळून बेचिराख केले आहे.

दहशतवाद्यांनी जाळले अख्खे गाव; २००० ठार?
बागा (नायजेरिया) : नायजेरियातील बागा गावावर बोको हराम दहशतवाद्यानी एकापाठोपाठ दोन हल्ले चढविले असून, संपूर्ण गाव जाळून बेचिराख केले आहे. गावातील रस्त्यांवर मृतदेह पडलेले असून २ हजार लोक ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी बोको हराम दहशतवाद्यांनी येथील लष्करी तळ ताब्यात घेतला होता, त्यानंतर गाव जाळून टाकण्यात आले.
सोमवारी बोको हरामने दहशतवादग्रस्त बोर्नो प्रांत ७० टक्के ताब्यात घेतला आहे.
या भागातील सरकारी अधिकारी मुसा आल्हाजी बुकार यांनी दिलेल्या माहितीनुसार या गावातून पळून जाणाऱ्या लोकानी गाव जाळल्याचे सांगितले.
१० हजार लोकसंख्या असणारे गाव निर्मनुष्य झाल्याचे लोकानी सांगितले. संपूर्ण गाव जाळून टाकण्यात आले आहे. पळून जाणाऱ्या लोकांनी मृतांवर अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याचे सांगितले. गावातील रस्त्यांवर
मृतदेह पडलेले आहेत. बोको हरामने बागा व इतर १६ गावांचा ताबा घेतला आहे. (वृत्तसंस्था)