नीसमधील सर्व भारतीय सुखरुप, हा आहे हेल्पलाईन नंबर..

By Admin | Updated: July 15, 2016 11:40 IST2016-07-15T10:22:14+5:302016-07-15T11:40:19+5:30

फ्रान्समधील नीस शहरातील रिसॉर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाही भारतीयाला हानी पोहोचलेली नाही. सर्व भारतीय सुखरुप आहेत.

All Indian safari in Nizam, this is helpline number. | नीसमधील सर्व भारतीय सुखरुप, हा आहे हेल्पलाईन नंबर..

नीसमधील सर्व भारतीय सुखरुप, हा आहे हेल्पलाईन नंबर..

ऑनलाइन लोकमत 

नीस, दि. १५ - फ्रान्समधील नीस शहरातील रिसॉर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाही भारतीयाला हानी पोहोचलेली नाही. सर्व भारतीय सुखरुप आहेत अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली आहे. नीसमधील रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिनाचा जल्लोष सुरु असताना एका अतिरेक्याने जमलेल्या गर्दीमध्ये ट्रक घुसवून अनेकांना चिरडले. यात आतापर्यंत ८० जण ठार झाले आहेत.  
 
पॅरिसमधील भारतीय राजदूत नीसमधील भारतीयांच्या संपर्कात असून, आतापर्यंत कोणाही भारतीयाला हानी पोहोचल्याचे वृत्त नाही असे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी टि्वटवरुन सांगितले. पॅरिसमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. 
 
दोन किमीच्या परिघातील गर्दीवर ट्रक चढवणा-या या ट्रक ड्रायव्हरला ठार करण्यात आले आहे. नीसच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. पॅरिसवर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आठ महिन्यातच फ्रान्समध्ये झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. 
 

Web Title: All Indian safari in Nizam, this is helpline number.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.