महिलेवरील लैंगिक छळाची बातमी लीक, कंपनीने 10 कर्मचाऱ्यांना काढून टाकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:12 AM2021-08-31T08:12:49+5:302021-08-31T08:13:22+5:30

Alibaba Fires 10 for Leaking Sexual Assault Accusations : ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने एका माजी व्यवस्थापकावर लैंगिक छळाच्या आरोपानंतर महिला कर्मचाऱ्याचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केल्याप्रकरणी 10 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे

alibaba dismissed 10 more employees after manager for leaking sexual assault accusations | महिलेवरील लैंगिक छळाची बातमी लीक, कंपनीने 10 कर्मचाऱ्यांना काढून टाकले 

महिलेवरील लैंगिक छळाची बातमी लीक, कंपनीने 10 कर्मचाऱ्यांना काढून टाकले 

googlenewsNext

चीनमधील ई-कॉमर्स (E-Commerce) अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड कंपनीने (Alibaba Group Holding Ltd.) आपल्या 10 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. एका महिला कर्मचाऱ्याचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केल्याबद्दल या दहा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. या महिलेने आपल्या व्यवस्थापकावर इंटरनल अकाउंटद्वारे लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. (Alibaba Fires 10 for Leaking Sexual Assault Accusations)

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने एका माजी व्यवस्थापकावर लैंगिक छळाच्या आरोपानंतर महिला कर्मचाऱ्याचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केल्याप्रकरणी 10 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, अलीबाबा कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी महिला कर्मचाऱ्याकडून केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर आपल्या व्यवस्थापकाला निलंबित केले होते. 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॅनियल झांग (Daniel Zhang) यांनी सांगितले होते की, एका महिला कर्मचाऱ्याने व्यवस्थापकावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, तपासानंतर कंपनीने संबंधित व्यवस्थापकाला काढून टाकले आहे. या व्यवस्थापकावरील कारवाईनंतर कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी महिलेचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केले, अशी माहिती देण्यात आली. 

या कर्मचाऱ्यांवर सार्वजनिक डोमेनमध्ये महिलेच्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आल्याचा आरोप आहे. कंपनीत जवळपास 250,000 कर्मचारी काम करतात. कंपनीच्या व्यवस्थापकावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलेची ओळख उघड झाल्यामुळे कंपनीने ही मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी कंपनीने आरोपी व्यवस्थापकाची हकालपट्टी केली असून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. तसेच, 10 कर्मचाऱ्यांही बडतर्फ करण्यात आले आहे. परंतु या प्रकरणामुळे कॉर्पोरेट वर्तुळात याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. तर कंपनीने म्हटले आहे की,  सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वर्कप्लेस सुनिश्चित करणे हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 

Web Title: alibaba dismissed 10 more employees after manager for leaking sexual assault accusations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.