शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Solar Storm: आधीच कोळसा संकट, त्यात काळोख्या रात्री सौर वादळ धडकणार; अनेक देशांत वीज जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:11 IST

Solar storm will hit today: अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वॉशिंग्टन : अंतराळातून आज मोठे सौर वादळ (Solar storm ) पृथ्वीच्या (Earth) दिशेने वेगात येत आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे सौर वादळ थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असून वीज ठप्प होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यामुळे आधीच विजेची टंचाई जाणवत असताना ग्रीड फेल झाल्याने वीज उत्पादनच ठप्प होण्याची शक्यता जगावर आहे. 

अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सौर वादळामुळे अंतराळातही हालचाली वाढल्या आहेत. अमेरिकेच्या नॅशनल ओसेनिक अँड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने हा इशारा दिला आहे. या वादळामुळे जगातील अनेक देशांच्या पावर ग्रीडमध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच व्होल्टेजमध्ये देखील संकट येऊ शकते. धक्कादायक बाब म्हणजे या वादळाचा परिणाम वाढू शकतो तसेच ते जी २ श्रेणीत जाऊ शकते. एजन्सीनुसार ते वेगवान होऊ शकते. 

अमेरिकेच्या या एजन्सीने सांगितले की, या वादळाचा परिणाम 11 ऑक्टोबरला सुरु होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत राहिल. ब्रिटनने देखील आकाशात रंगीत प्रकाश पाहता येईल असे म्हटले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, या वादळामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता नाहीय. पृथ्वीवर सर्वात धोकादायक सौर वादळ हे 1859 मध्ये आले होते. या वादळाने अमेरिका, युरोपमधील टेलिग्राफ नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. तर काही दिवसापूर्वी यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्नियाच्या प्राध्यापिका  संगीता अब्दु ज्योति यांनी भविष्यातील सौर वादळांमुळे इंटरनेट उद्ध्वस्त होईल असा इशारा दिला होता. 

टॅग्स :Earthपृथ्वीelectricityवीजCoal Shortageकोळसा संकट