शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 19:32 IST

...आता ही AI मंत्री प्रेग्नेंट असून, एकाच वेळी ८३ 'बाळांना' जन्म देणार असल्याचे अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी म्हटले आहे.

आपल्या मंत्रिमंडळात एका नॉन-ह्यूमन (Non-Human) मंत्र्याचा समावेश करणारा अल्बानियानिया हा जगातील पहिला देश आहे.  या मंत्र्याचे नाव 'डिएला' (Diella) असून ती पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) बनवण्यात आली आहे. यानंतर आता आणखी एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. आता ही AI मंत्री प्रेग्नेंट असून, एकाच वेळी ८३ 'बाळांना' जन्म देणार असल्याचे अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी म्हटले आहे.

खरे तर, अल्बानिया सरकार प्रत्येक खासदारासाठी एआय असिस्टंट बनवण्यावर विचार करत आहे. याचा संबंध त्यांनी डिएला प्रेग्नेंट असण्याशी आणि 83 बालकांना जन्म देण्याशी जोडला आहे. बर्लिनमध्ये ग्लोबल डायलॉग (BGD) मध्ये बोलताना अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा म्हणाले, 'आम्ही डिएलासोबत एक मोठी जोखिम घेतली आणि यात यशस्वी ठरलो. आता डिएला प्रेग्नेंट आहे आणि तिच्या पोटात ८३ मुले आहेत." 

त्यानी दिलेल्या माहितीनुसार, हे असिस्टंट संसदेत होणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद ठेवतील आणि खासदारांना सुटलेल्या कार्यक्रमांची तसेच चर्चांची माहिती देतील. प्रत्येक 'बाळ' खासदारासाठी असिस्टंट म्हणून काम करेल, त्यांना सूचना देईल. महत्वाचे म्हणजे, त्यांना 'आई' (डिएला) बद्दलही माहिती असेल.

सध्या अल्बानिया सरकार २०२६ पर्यंत ही AI व्यवस्था पूर्णपणे लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे. कामकाजावेळी उपस्थित राहू न शकलेल्या खासदारांना हॉलमधील चर्चा आणि कशावर काउंटर ॲटॅक करायचा, यासंदर्भातही हे 'डिजिटल बाळ' त्यांना माहिती देईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

विशेष म्हणजे, डिएलाची नियुक्ती सप्टेंबरमध्ये अल्बानियाची सार्वजनिक खरेदी प्रणाली (Public Procurement System) पूर्णपणे पारदर्शक आणि १०० टक्के भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी करण्यात आली होती. पारंपरिक अल्बानियाई वेशभूषेतील महिलेच्या रूपात दाखवलेल्या या AI मंत्र्यावर सार्वजनिक निविदांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Albania's AI Minister 'Pregnant,' to 'birth' 83 AI Assistants!

Web Summary : Albania's AI minister, 'Diella,' is 'pregnant' and will 'birth' 83 AI assistants for parliamentarians. These AI assistants will monitor parliamentary proceedings and provide information, aiming for full implementation by 2026, enhancing transparency.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सministerमंत्रीParliamentसंसदtechnologyतंत्रज्ञान