१३३ प्रवाशांना घेऊन हैदराबादवरून उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाचा मोठा अपघात टळला. विमान थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना समोरील चाक निखळून पडले. त्यामुळे विमान धावपट्टीवर जोरात आदळले आणि फसले. बुधवारी (११ मार्च) ही घटना घडली. आता अनेक तासांसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस IX938 या विमानाने हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. थायलंडमधील फुकेतमध्ये बुधवारी ते पोहोचले. १३३ प्रवासी असलेले हे विमानतळावर उतरणार होते. त्याचवेळी विमानाचे नाकाजवळी एक चाक निखळून पडले.
विमान प्राधिकरण अधिकाऱ्यानी सांगितले की, यात कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद करण्यात आली आहे.
हे विमान बुधवारी सकाळी ११.४० वाजता पोहचणार होते. पण, ते ११.२४ वाजता पोहोचले. हार्ड लँडिंग झाल्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी पाहणी केली, तेव्हा समोरील चाक निखळल्याचे आढळून आले. विमानात दोन लहान मुले आणि सात क्रू मेंबर्स होते.
फुकेत विमानतळ प्रशासनाने ही धावपट्टी काही काळासाठी बंद करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी १२.०८ पासून ते सायंकाळी ६.०० पर्यंत धावपट्टीवरील विमान बाजूला करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर धावपट्टीची पाहणी आणि दुरूस्तीही केली जाणार आहे.
या घटनेमुळे फुकेत विमानतळावर लँडिंगसाठी काही विमानांना प्रतिक्षा करावी लागली. तर काही विमाने दुसरीकडे वळवण्यात आली. वळवण्यात आलेली विमाने करबी, सूरत थानी या फुकेतपासून जवळ असलेल्या विमानतळांवर उतरवण्यात आली.
Web Summary : An Air India Express flight from Hyderabad, carrying 133 passengers, narrowly avoided an accident in Phuket, Thailand. The nose wheel detached upon landing, causing a hard landing. No injuries were reported, but the runway was temporarily closed.
Web Summary : हैदराबाद से 133 यात्रियों को लेकर जा रहा एयर इंडिया एक्सप्रेस विमान फुकेत में दुर्घटनाग्रस्त होने से बाल-बाल बचा। लैंडिंग के दौरान सामने का पहिया निकल गया, जिससे विमान ज़ोर से उतरा। कोई घायल नहीं हुआ, लेकिन रनवे बंद कर दिया गया।