शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 22:00 IST

Afghanistan Crisis : १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती. 

ठळक मुद्दे १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती. 

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं एअर इंडियाचं विमान (Air India) रविवारी रात्री सुरक्षित दिल्ली विमानतळावर पोहोचलं. अफगाणिस्तानमधील बहुतांश भागांवर पुन्हा एकदा तालिबाननं नियंत्रण मिळवलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडला आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाचं विमानन AI244 हे प्रवाशांना घेऊन भारतात परतलं आहे.

उड्डाणं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच सोमवारीदेखील विमान उड्डाण घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केवळ एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू आहे. विमानानं रविवारी दुपारी ४० प्रवाशांसह दिल्लीहून काबुलसाठी उड्डाण घेतलं होतं, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. दुपारी जवळपास १२.४५ मिनिटांनी AI243 हे विमान दिल्लीहून रवाना झालं. परंतु काबुल विमानतळाजवळ हवेत जवळपास एक तास चक्कर मारावी लागली, कारण उतरण्यासाठी एटीसीक़डून परवानगी मिळत नव्हती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

दरम्यान, विमानाला उतरण्यास विलंब करण्यामागचं कारण काय होतं हे स्पष्ट नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर AI 244 हे विमान भारतीय वेळेनुसार जवळपास संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काबुलवरून रवाना करण्यात आलं. सध्या कंपनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

लोकांसोबत गद्दारी"जेव्हा मी त्या ठिकाणाहून पळालो आहे तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती काय आहे हे समजू शकता. अशरफ गनी याची टीम गद्दार आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत," अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी खासदार जमील करझई यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर दिली. "अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास अनेक राजकीय लोकांनी काबुल सोडलं. २०० जण दिल्लीला आले आहेत. मला असं वाटतंय हे नवं तालिबान आहे. ते महिलांनादेखील काम करण्याची परवानगी देतील,"अशी प्रतिक्रिया अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्ला अहमदझई यांनी दिल्लीला आल्यानंतर दिली. "जगानं अफगाणिस्तानला वेगळं सोडलं यावर विश्वास बसत नाही. त्या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आहे, त्याचा खून होऊ शकतो. तालिबान आम्हालाही मारू शकते. आमच्या महिलांना आथा त्या ठिकाणी अधिक अधिकार मिळणार नाही," अशी प्रतिक्रिया भारतात आलेल्या एका महिलेनं दिली. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतdelhiदिल्लीPresidentराष्ट्राध्यक्षWomenमहिला