तुर्कस्तानमधील सत्तापलटाच्या कटात एअरफोर्स चीफचा समावेश
By Admin | Updated: July 18, 2016 22:19 IST2016-07-18T22:19:15+5:302016-07-18T22:19:15+5:30
बंड अखेर शमलं असून ५ जनरल्स व २७ कर्नल्स यांच्यासह लष्करामधल्या तब्बल २००० बंडखोरांना अटक करण्यात आली. या सत्तापालट प्रकरणी आज नवी माहिती समोर आली आहे.

तुर्कस्तानमधील सत्तापलटाच्या कटात एअरफोर्स चीफचा समावेश
>ऑनलाइन लोकमत
इस्तांबुल, दि. १८ : तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने शुक्रवारी (१६) उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत २०० जण ठार झाले होते. हे बंड अखेर शमलं असून ५ जनरल्स व २७ कर्नल्स यांच्यासह लष्करामधल्या तब्बल २००० बंडखोरांना अटक करण्यात आली. या सत्तापालट प्रकरणी आज नवी माहिती समोर आली आहे.
स्थानिक मीडियाच्या माहीतीनुसार या कटामध्ये एअरफोर्स चीफचा समावेश आहे. तशी कबूली त्याने दिली आहे. टर्कीचे एअरफोर्स चीफ अकीन उजतुर्क यांनी शुक्रवारी झालेल्या सत्तापालटाच्या कटामध्ये आपण सामील असल्याची कबूली दिली आहे. सरकार सत्तापलटमध्ये सहभागी असलेल्यानां मृत्यूदंडाची शिक्षा देणार असल्याचेही वृत्त आहे.