एअर आशियाच्या विमानाचा मुख्य तुकडा सापडला
By Admin | Updated: January 6, 2015 02:34 IST2015-01-06T02:34:20+5:302015-01-06T02:34:20+5:30
जकार्ता- एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा शोध घेणाऱ्या इंडोनेशियाच्या शोध पथकाला विमानाचा शेपटाकडचा तुकडा सापडला

एअर आशियाच्या विमानाचा मुख्य तुकडा सापडला
सिंगापूर : जकार्ता- एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा शोध घेणाऱ्या इंडोनेशियाच्या शोध पथकाला विमानाचा शेपटाकडचा तुकडा सापडला असून, याच भागात ब्लॅकबॉक्स असल्याने तो सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच सोमवारी वातावरणही निवळले असून, समुद्र शांत असल्याने तीन मृतदेहही मिळाले आहेत.
आम्हाला जे सापडले आहे तो विमानाचा बहुतेक मागचा शेपटाचा भाग आहे, असे इंडोनेशियाच्या गस्त पथकाचे कर्णधार याह्यान सोफयान म्हणाले. इंडोनेशियाच्या मदत पथकाने या शोधावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. फ्लाईट रेकॉर्डरमुळे विमान अपघाताचे गूढ उलगडण्यास मोठी मदत होणार आहे.
इंडोनेशिया नौदलाच्या पाणबुड्यांना समुद्र शांत असल्याने अवशेष नीट शोधता आले, त्यामुळे हा महत्त्वाचा शोध लागू शकला. सोमवारी आणखी तीन मृतदेह हाती आले असून आता वर काढलेल्या एकूण मृतदेहांची संख्या ३७ झाली आहे. जिथे हे मृतदेह मिळाले तिथे विमानाचे सर्वाधिक अवशेष आहेत. (वृत्तसंस्था)
च्सुराबाया- इंडोनेशियातील युनिता सायवाल या तरुणीला तिचा भाऊ अपघातग्रस्त विमानात असल्याचे त्याच्या सेल्फीवरून कळले होते. सिंगापूरला जाणार असल्याचे भाऊ हेंद्रा गुणवान याने तिला सांगितले नव्हते; पण विमानात बसताना त्याने आपल्या मित्रांसह सेल्फी काढला होता.
च्तो सेल्फी तिला भावाच्या मित्राने पाठवला, त्यावरून आपला भाऊ या विमानात गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आई-वडिलांना फोन करून खात्री करून घेतली. मग सुराबायाला प्रयाण केले. आठ दिवसांनंतर शनिवारी त्याचा मृतदेह समोर दिसला आणि युनिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.