एअर अल्जेरीचे विमान कोसळले
By Admin | Updated: July 24, 2014 17:28 IST2014-07-24T15:56:56+5:302014-07-24T17:28:24+5:30
विमान अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी एअर अल्जेरी या एअरलाइन्स कंपनीचे आफ्रिका येथील निगेरजवळ कोसळले आहे.

एअर अल्जेरीचे विमान कोसळले
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २४- विमान अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी एअर अल्जेरीचे विमान निगेरजवळ कोसळले आहे. बर्किनो फासोतील विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या ५० मिनीटानंतर विमानाशी संपर्क तुटला होता. या विमानात सुमारे ११० प्रवासी व ७ क्रू मेंबर्स असल्याचे वृत्त आहे.
एअर अल्जेरीच्या एएच २०१७ या विमानाने गुरुवारी सकाळी ओगाड्यूगो विमानतळावरुन अल्जीयर्सच्या दिशेने उड्डाण घेतले. मात्र उड्डाणाच्या ५० मिनीटानंतर रडारवर विमान दिसत नव्हते. तसेच विमानाशीही संपर्क तुटला. यानंतर विमानाच्या शोधमोहीमेला सुरुवात झाली. अखेरीस निगेरजवळ हे विमान कोसळल्याचे उघड झाले.