शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

चीनच्या दादागिरीचा The End! भारतासह 'हे' १४ देश एकत्र आले; ड्रॅगनला रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 15:14 IST

हा करार ड्रॅगनवरील निर्भरता कमी करण्यासोबत भविष्यात पुरवठा साखळीवरील येणारे संकट संपवण्यासाठी आहे.

नवी दिल्ली - जगभरात दादागिरीने स्वत:चा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला जोरदार झटका लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे कमकुवत आणि छोटे देशांना चीनने त्यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकवले आहे. चीनकडून कर्ज घेणारे अनेक देशावर सध्या आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशांत महासागरापासून बॉर्डरपर्यंत अनेक नापाक कारवाया करणाऱ्या चीनचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता आहे. चीनच्या कारवायांना रोखण्यासाठी आता १४ देशांनी मिळून एक करार केला आहे. 

हा करार ड्रॅगनवरील निर्भरता कमी करण्यासोबत भविष्यात पुरवठा साखळीवरील येणारे संकट संपवण्यासाठी आहे. यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यासह इंडो पॅसिफिक इकोनॉमिक फ्रेमवर्कच्या १४ भागीदारी देशांशी करार केला आहे. हा करार पुरवठा साखळी कुठल्याही अडथळ्याविना सुरळीत चालण्यासाठी आहे. मागील आठवड्यात डेट्रायटमध्ये IPEF देशांची दुसरी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये समूहाने आयपीईएफ सप्लाय चेन कौन्सिल, सप्लाय चेन क्रायसिस रिस्पॉन्स नेटवर्क आणि लेबर राइट्स अॅडव्हायझरी नेटवर्क स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे.

या १४ देशांचा जागतिक GDP मध्ये ४०% वाटाआयपीईएफने व्यवसायाच्या वाढीवर, चांगली अर्थव्यवस्था आणि फेअर इकोनॉमीवर भर दिला आहे. चांगल्या अर्थव्यवस्थेच्या चौकटीत, सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक हायड्रोजन उपक्रम स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. आयपीईएफ देशांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण हे देश जागतिक जीडीपीच्या ४० टक्के आणि जागतिक वस्तू आणि सेवा व्यापाराचे २८ टक्के प्रतिनिधित्व करतात.

चीनच्या दादागिरीला लगाम लागणारचीन बेल्ट अँड रोड इनिशएटिव्हच्या माध्यमातून आशियातील अनेक शेजारील राष्ट्रांवर दादागिरी करत आहे. BRI ने अनेक बाबतीत लाभार्थी देशांना मागे ढकलले आहे आणि त्यांना दिवाळखोरीकडे नेले. मात्र, चीनच्या प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारीची म्हणजेच आरसीईपीची ही युक्ती भारताला आधीच कळली होती आणि त्यांनी त्यापासून दूर राहण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला होता. आशियातील भारताचा प्रभाव मर्यादित करणे आणि जगावर प्रभाव टाकणारी जागतिक शक्ती बनण्याची भारताची कोणतीही महत्त्वाकांक्षा थांबवणे ही चीनची सर्वात मोठी चिंता आहे.

IPEF हा क्वाड प्लसचा उपक्रमअमेरिका आणि युरोपियन युनियनला इंडो-पॅसिफिकसाठी खुला, पारदर्शक आणि नियमांवर आधारित दृष्टीकोन हवा आहे ज्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी अमेरिकेने आशियामध्ये आयपीईएफ सुरू केले. क्वाड प्लसचा हा उपक्रम आहे. या माध्यमातून भारत प्रशांत महासागरातील चीनचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न करेल. याद्वारे सर्व देश एकमेकांसोबतची पुरवठा साखळी चीनपासून वेगळी करणार आहेत. IPEF मध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, फिजी, भारत, इंडोनेशिया, जपान, कोरिया, मलेशिया, न्यूझीलँड, फिलीपिंस, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका