अग्नीशमन दलाने कुत्र्याच्या मदतीने आगीतून मुलांना वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 22:43 IST2016-04-28T22:33:12+5:302016-04-28T22:43:45+5:30
जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याच्या मदतीने आगीपासून दोन मुलांना वाचविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.

अग्नीशमन दलाने कुत्र्याच्या मदतीने आगीतून मुलांना वाचविले
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा. दि. २८ - जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याच्या मदतीने आगीपासून दोन मुलांना वाचविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.
सेन्ट्रल फ्लोरिडा येथील एका घराला आग लागली. यावेळी या घरातील मॅक्स नावच्या कुत्र्याने मालकाच्या चार वर्षीय मुलाला आणि दोन वर्षीय मुलीला वाचविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना मदत केली. ज्यावेळी घरात आग लागली, त्यावेळी सर्वत्र धूर पसरला होता. घराशेजारी असलेल्यांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना धुरामुळे घरात जाण्यास त्रास होत होता. आग लागलेल्या घरात दोन लहान मुले अडकल्याने सर्वांची धावपळ उडाली होती. यावेळी आग लागलेल्या घर मालकाच्याच प्रशिक्षण दिलेल्या मॅक्सची मदत अग्नीशमन दलाच्या जवानांनी घेतली आणि आगीपासून दोन्ही मुलांची सुटका केली. दरम्यान, या आगीत मॅक्स किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.