शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात शेख हसीना यांच्याविरोधात हलकल्लोळ; माजी PM वर खटल्यांचा सिलसिला थांबेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 10:48 IST

Sheikh Hasina Cases, Bangladesh Violence: बांगलादेश सोडून निघून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत नाहीत.

Sheikh Hasina Cases, Bangladesh Violence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सिलसिला सुरुच आहे. आता त्यांच्यावर हत्येचे ५ नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ५ मृत्युंबाबात खुनाच्या गुन्ह्यांसह शेख हसीना आणि त्यांच्या साथीदारांवर एकूण ८९ गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध हे खटले ढाका येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर आणि अन्य ३३९ जणांची नावेही या प्रकरणांमध्ये आहेत. यापैकी काहींविरुद्ध पीडितांच्या नातेवाईकांनी सोमवारी ढाका येथील विविध महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल केले आहेत. बांगलादेशातील विद्यार्थ्यांचे हे आंदोलन जुलैमध्ये सुरू झाले. त्यासंदर्भात अनेक खटले आहेत.

६००हून अधिक लोकांचा मृत्यू

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मृतांचा आकडा ६००च्या पुढे गेला आहे. निदर्शने उग्र झाल्यानंतर, शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवामी लीग पक्षाचे सरकार ५ ऑगस्ट रोजी सत्तेवरून हटवण्यात आले. आता बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कार्यरत आहे.

शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द

शेख हसीना अनेक वर्षे बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्या बांगलादेशातून पळून भारतात आल्या. त्या अजूनही भारतातच आहेत. बांगलादेशने त्यांचा राजकीय पासपोर्ट रद्द केला आहे. म्हणजेच त्या ज्या पासपोर्टसह भारतात आल्या होत्या, तो आता वैध नाही. त्यामुळे आता शेख हसीना काय करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशprime ministerपंतप्रधानagitationआंदोलनPoliceपोलिस