आक्रमक चीनची सुपरसॉनिक अण्वस्त्र वाहनाची चाचणी
By Admin | Updated: June 15, 2015 00:08 IST2015-06-15T00:08:02+5:302015-06-15T00:08:02+5:30
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सुपरसॉनिक अण्वस्त्र वाहनाची यशस्वी चाचणी केल्याची घोषणा आज केली असून, दक्षिण चिनी समुद्रातील सीमा व बेटांची

आक्रमक चीनची सुपरसॉनिक अण्वस्त्र वाहनाची चाचणी
बीजिंग : चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सुपरसॉनिक अण्वस्त्र वाहनाची यशस्वी चाचणी केल्याची घोषणा आज केली असून, दक्षिण चिनी समुद्रातील सीमा व बेटांची मालकी यावरून चीनचे अनेक देशांशी वाद चालू असताना अत्यंत तणावाच्या वातावरणात चीनने केलेली ही चाचणी म्हणजे चीनचे शक्तिप्रदर्शन असल्याची टीका अमेरिकेने केली आहे.
वू १४ या क्षेपणास्त्र प्रणालीतील ही चौथी चाचणी आहे. आमच्या भूभागामध्ये आम्ही केलेली ही चाचणी म्हणजे शास्त्रीय संशोधनाचा एक भाग असून, या चाचणीचा संबंध कोणत्याही देशाला लक्ष्य ठेवून करण्यात आलेला नाही असे हाँगकाँगमधील दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने चीनच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देऊन म्हटले आहे.
अमेरिकेला प्रत्युत्तर
पण संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिका चीनच्या सागरी सीमावादात सातत्याने हस्तक्षेप करीत असून, अमेरिकेला आपली क्षमता दाखविण्यासाठी चीन अण्वस्त्रांची चाचणी पाठोपाठ करीत आहे.
(वृत्तसंस्था)