काही महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो यांना नाट्यमय घडमोडी आणि थरारक कारवाईच्या माध्यमातून अटक करत अमेरिकेने तिथे सत्तांतर घडवून आलेले होते. त्यानंतर अमेरिकेने इस्राइलच्या साथीने इराणवर हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या केली. तसेच इराणमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका देशावर वक्रदृष्टी टाकली असल्याचे संकेत मिळत आहेत.
व्हेनेझुएला आणि इराणनंतर अमेरिकेच्या निशाण्यावर असलेल्या देशाचं नाव आहे क्युबा. इराणवर अमेरिकेचे हल्ले सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाबाबत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. क्युबासोबत एखादा मोठा करार होईल किंवा अमेरिका आपल्या मर्जीनं एखादं कठोर पाऊल उचलेल. मात्र सध्यातरी अमेरिकेचं प्राधान्य इराण आहे. तसेच क्युबाबाबतचा कुठलाही निर्णय हा इराणचा प्रश्न सुटल्यानंतरच घेतला जाईल, असे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इराण युद्धाबाबत माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेच्या सैन्यदलांनी केलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या सैन्यदलाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. युद्ध आता थांबवलं तर इराणला आपली लष्करी ताकद परत मिळवण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. मात्र आताच मी युद्ध थांबवण्याची अधिकृत घोषणा करणार नाही. अमेरिकन सैन्याने इराणचं हवाई दल आणि एअर डिफेन्स सिस्टिम जवळपास संपुष्टात आणली आहे. इराणचं सैन्य आता बऱ्यापैकी कमकुवत झालं आहे. तसेच या मोहिमेमध्ये इराणच्या अनेक नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
Web Summary : Following Venezuela and Iran, Cuba is now on Trump's radar. While prioritizing Iran, the US contemplates action against Cuba after resolving the Iran issue. Trump claims US military action severely weakened Iran's forces, setting them back a decade.
Web Summary : वेनेजुएला और ईरान के बाद, अब क्यूबा ट्रम्प के निशाने पर है। ईरान को प्राथमिकता देते हुए, अमेरिका ईरान मुद्दे को हल करने के बाद क्यूबा के खिलाफ कार्रवाई पर विचार कर रहा है। ट्रम्प का दावा है कि अमेरिकी सैन्य कार्रवाई ने ईरान की सेना को गंभीर रूप से कमजोर कर दिया है, जिससे उन्हें एक दशक पीछे धकेल दिया गया है।