Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:24 PM2022-11-30T19:24:55+5:302022-11-30T19:25:50+5:30

क्वादिमीर पुतिन यांनी चीनसोबत मिळून त्या देशाच्या संरक्षित हवाई क्षेत्रात युद्ध विमाने पाठवली.

after Ukraine Putin will go to war with south korea ?; Warplanes sent to their airspace | Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने

Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने

Next


गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच, रशिया आणखी एक युद्ध सुरू करण्याच्या तयारीत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनदक्षिण कोरियावर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, चीन आणि रशियाची युद्ध विमाने दक्षिण कोरियाच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसली. 

दक्षिण कोरियाच्या लष्कराने एका निवेदनात सांगितल्यानुसार, 30 नोव्हेंबरच्या पहाटे दोन चिनी आणि सहा रशियन युद्ध विमानांनी त्यांच्या हवाई संरक्षण क्षेत्राचे उल्लंघन केले. पहाटे 5:50 वाजता दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील आणि ईशान्य किनार्‍यावरील कोरिया एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (KADIZ) मध्ये विमाने दाखल झाली. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ (JCS) च्या म्हणण्यानुसार त्यांनी काही तासांनंतर या भागात पुन्हा प्रवेश केला.

हवाई संरक्षण क्षेत्र हे असे क्षेत्र असते, जिथे इतर देशातील विमानांना बंदी असते. मास्को कोरियाच्या हवाई संरक्षण क्षेत्राला मान्यता देत नाही. बीजिंगनेही म्हटले की, हे क्षेत्र प्रादेशिक हवाई क्षेत्र नाही आणि सर्व देशांना तिथे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, या कारवाईनंतर दक्षिण कोरिया सरकार अलर्ट झाले आहे. पुढे काय होईल, हे येणाऱ्या काळात समजेलच.

Web Title: after Ukraine Putin will go to war with south korea ?; Warplanes sent to their airspace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.