शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबतच्या ट्रेड डीलनंतर, अमेरिकेनं जारी केला नकाशा; पाकिस्तान, चीनचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 22:58 IST

us india trade deal new map released showed pok and aksai chin as part of india

भारत-अमेरिका व्यापार कराराबरोबरच एका नकाशाने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने भारताचा एक नवा नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्याने, पाकिस्तान आणि चीन दोघांचेही टेन्शन वाढले असणार. कारण या नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीर, पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) आणि अक्साई चिन भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहेत.

पाकिस्तानसाठी मोठा धक्का - खरे तर, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. यासाठी आम्हाला परकीय मंजुरीची गरज नाही, असे भारताने अनेक वेळा म्हटले आहे. मात्र असे असले तरी, अमेरिकेने असा नकाशा प्रसिद्ध करणे हा पाकिस्तानसाठी एक मोठा राजकीय आणि राजनैतिक धक्का असल्याचे बोलले जात आहे. आजवर पाकिसतान नाराज होऊ नये, म्हणून अमेरिकेने पीओकेसंदर्भात अत्यंत संतुलित भूमिका ठेवली आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने जारी केलेला हा नवा नकाशा पाकिस्तानच्या दाव्यांना सुरुंग लावणारा आहे. 

चीनलाही धक्का - महत्वाची गोष्ट म्हणजे, या नकाशात अमेरिकेने चीनच्या ताब्यातील अक्साई चिनहीदर्शवला आहे. तत्पूर्वी, भारताने अनेक वेळा परदेशी संस्थांनी जारी केलेल्या चुकीच्या नकाशांवर आक्षेप घेतला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या या नकाशाकडे, भारताच्या आक्षेपांना मिळालेली ही मोठी पावती म्हणून बघिते जात आहे. 

यासंदर्भात बोलताना, निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, हे अमेरिकेचे एक उत्तम पाऊल आहे. इतर अनेक जण म्हणतात की हे पाकिस्तानच्या अलिकडच्या राजनैतिक प्रयत्नांना हा मोठा धक्का आहे.

व्यापार कराराचा भारताला फायदा -केवळ नकाशाच नव्हे, तर व्यापारातही भारताला मोठा फायदा झाला आहे. ट्रम्प सरकारने भारतीय वस्तूंवरील ५० टक्के कर आता १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे लोखंड, औषधे आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भारतीय निर्यातीला मोठी बळकटी मिळेल. महत्वाचे म्हणजे, भारताने आपल्या शेतकऱ्यांचे आणि दुग्धव्यवसायातील हित जप हा मोठा करार केला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनJammu Kashmirजम्मू-काश्मीर