मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. स्ट्रेट होर्मुझमधील तेल वाहतुक रोखल्याने जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. त्यातच इराणने आता अख्ख्या जगाला तेलाच्या थेंबा थेंबापासून तरसवण्याची तयारी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ जवळपास ठप्प झाल्याने जगात इंधन संकट वाढले आहे. आता इराण तेलाचा पुरवठा करणारा आणखी एक मार्ग बंद करण्याचा विचार करत आहे. अरबी द्वीपकल्पाजवळील एक महत्त्वाचा सागरी मार्ग बाब अल-मंदेब बंद करण्याची योजना इराण आखत असल्याचं समोर आले आहे.
एका रिपोर्टनुसार, जर अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ले सुरूच ठेवले आणि युद्ध दीर्घकाळ खेचून धरले तर इराण बाब अल मंदेब येथून वाहतूक करणारी जहाजे रोखू शकतो. इराणी सैन्याची नजर आता या वाहतूक मार्गावर आहे. जर अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते आणि इतर बड्या नेत्यांना टार्गेट केले तर आमच्याकडे हा मार्ग बंद करण्याशिवाय पर्याय नाही असं इराणने म्हटलं आहे.
इराणचा कडक इशारा
याआधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सुरू असलेले युद्ध जवळपास संपले आहे असं म्हटले होते. त्यावर इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने पलटवार केला आहे. हे युद्ध कधी संपणार याचा निर्णय इराण करेल. जर अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरू राहिले तर इराण आपल्या परिसरातून एक लीटर तेलही बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकीच इराणने दिली आहे.
बाब-अल-मंदेब महत्त्वाचा सागरी मार्ग
बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी हा एक अरुंद पण महत्त्वाचा सागरी मार्ग आहे जो लाल समुद्राला एडनच्या आखाताशी जोडतो. तो सुएझ कालव्याद्वारे भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागराला जोडणारा एक प्रमुख सागरी मार्ग म्हणून देखील काम करतो. अरबी द्वीपकल्पातील येमेन आणि आफ्रिकेतील जिबूती यांच्यामध्ये स्थित बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. आखाती देशातील युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ जवळपास ठप्प झाला आहे त्यात ही बाबा अल मंदेब मार्गाबाबत बातमी पुढे आली आहे.
तेलाच्या किंमती वाढल्या
पश्चिम आशियातील वाढत्या लष्करी तणावाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. सध्या १२० डॉलर प्रति बॅरल ही किंमत पोहचली आहे. गेल्या २ आठवड्यापासून आखाती देशात युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम तेल आणि गॅस पुरवठ्यावर होऊ लागला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गाने सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन, यूएई आणि इराणमधून तेल आणि गॅस निर्यात केला जातो. परंतु ही वाहतूक रोखल्याने कुवेत, इराक, सौदीला तेल उत्पादन कमी करावे लागले आहे. त्याचा भार जगातील इतर देशांना बसला आहे.
Web Summary : Amidst Middle East tensions, Iran may close Bab-el-Mandeb Strait if attacked, disrupting oil flow. This follows Strait of Hormuz disruptions, escalating global fuel concerns and oil prices. Saudi Arabia, Kuwait, and Iraq face production cuts.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, ईरान हमले की स्थिति में बाब-अल-मंडेब जलडमरूमध्य को बंद कर सकता है, जिससे तेल प्रवाह बाधित होगा। होर्मुज जलडमरूमध्य में व्यवधान के बाद, वैश्विक ईंधन चिंताएं और तेल की कीमतें बढ़ रही हैं। सऊदी अरब, कुवैत और इराक उत्पादन में कटौती का सामना कर रहे हैं।