शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:33 IST

३९ दिवस चाललेल्या युद्धात अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी लष्करी, आर्थिक आणि मानवी स्तरावर मोठे मूल्य चुकवले आहे.

३९ दिवस चाललेल्या युद्धात अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी लष्करी, आर्थिक आणि मानवी स्तरावर मोठे मूल्य चुकवले आहे.

अमेरिका

काय कमावले?

  • नको असलेल्या नेतृत्वाचा खात्मा : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा केला. अमेरिकेच्या धोरणांच्या आड अयातुल्ला येत होते, असे अमेरिका व इस्रायलचे म्हणणे होते. 
  • संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त : अमेरिकेच्या दाव्यानुसार, त्यांनी इराणची ९०% हवाई संरक्षण यंत्रणा व ७०% पोलाद उत्पादन क्षमता नष्ट केली आहे. त्यामुळे येथे  अमेरिकेला वर्चस्व ठेवता येईल. 
  • ऑपरेशन इपिक फ्युरी : इराणची क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रे आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या तळांचे मोठे नुकसान केले.

काय गमावले?

  • प्रचंड खर्च : युद्धाच्या पहिल्या ६ दिवसांतच अमेरिकेला ११.३ अब्ज डॉलर्स (९.५० लाख कोटी रुपये) खर्च आला. एकूण खर्च १८ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. याचा भार अमेरिकन लोकांवर पडेल.
  • मानवी हानी : १३ अमेरिकन सैनिक मारले गेले असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. शिवाय अनेक विमाने इराणने पाडली. त्याचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. 
  • साधनसामग्रीचे नुकसान : मध्यपूर्वेतील १७ अमेरिकन लष्करी तळांचे नुकसान झाले असून, त्यांचे रडार व उपग्रह टर्मिनल इराणच्या हल्ल्यात नष्ट झाले आहेत. 

इराण

काय कमावले?

  • होर्मुज सामुद्रधुनीवर नियंत्रण : सर्वात मोठा रणनीतिक फायदा. युद्धापूर्वी हा व्यापारी मार्ग सर्वांसाठी खुला होता, परंतु आता युद्धविरामा दरम्यान जहाजांची ये-जा इराणी सैन्याच्या व्यवस्थापन आणि समन्वयाखाली असेल. इराण, ओमान जहाजांकडून ट्रान्झिट शुल्क वसूल करण्याचीही योजना आखत आहेत.
  • शस्त्रसंधीच्या अटी : दोन आठवड्यांच्या या शस्त्रसंधीमध्ये इराणने आपल्यावरील निर्बंध उठवणे व गोठवलेला निधी परत मिळवण्यासाठी अमेरिकेवर दबाव निर्माण केला आहे. असे झाले तर इराण अमेरिकेवर भारी ठरेल.

काय गमावले?

  • नेतृत्व : युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही पोकळी त्यांना भरून काढावी लागेल. 
  • पायाभूत सुविधा : इराणचे अनेक तेल शुद्धीकरण प्रकल्प, पोलाद कारखाने व अणु सुविधांचे गंभीर नुकसान झाले आहे. ते उभे करण्यास प्रचंड पैसा व कालावधी लागेल. 
  • नागरी हानी : २००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ३२ लाख लोक विस्थापित झाले आहेत. शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले झाले. अनेक इमारतींचे, पाय़ाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

इस्रायल

काय गमावले?

  • मानवी आणि जीवित हानी : आतापर्यंत २७ नागरिक मारले गेले. १२ सैनिक मृत्युमुखी पडले. ७,००० हून अधिक लोक जखमी झाले.
  • पायाभूत सुविधांचे नुकसान : तेल अवीव, हैफा, बेनी ब्रॅक व पेटाह टिकवा सारख्या शहरांमधील इमारती आणि शाळांचे नुकसान. हैफा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेल अवीवमधील अमेरिकन दूतावासाच्या इमारतीचे नुकसान. 
  • आर्थिक फटका : अर्थव्यवस्था संकटात आली. युद्धाच्या काळात दर आठवड्याला सुमारे ९.४ अब्ज शेकल्स (३ अब्ज डॉलर्स) इतका आर्थिक तोटा सहन करावा लागला.

काय कमावले?

  • धोरणात्मक सुरक्षा : इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला लक्षणीय खिळ बसवली. नतान्झ, इतर प्रमुख अणु केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणची अण्वस्त्रे विकसित करण्याची क्षमता कित्येक वर्षे मागे पडली.  
  • लष्करी उद्दिष्टे : 'ऑपरेशन रोअरिंग लायन' अंतर्गत इस्रायलने इराणची क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'च्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले आहे. युद्धविराम झाला असली तरी, इस्रायलने स्पष्ट केले आहे की ही शस्त्रसंधी लेबनॉनला लागू नाही.

आखाती देश

कुवैत आणि यूएईसारख्या अमेरिकेचे सहयोगी आखाती देशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. आखाती देशांतील उंच इमारती आणि तेल प्रकल्प यावर हल्ले झाले.

जागतिक आणि भारतावर झालेला परिणाम

  • जागतिक तेल संकट : होर्मुझचा मार्ग बंद झाल्याने ऊर्जा संकट ओढवले. अने देशांमध्ये इंधनाचे दर वाढले. त्यामुळे विमान प्रवासही महागला. 
  • शेअर बाजार : युद्धाच्या काळात जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. तथापि, शस्त्रसंधीच्या बातमीमुळे ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात सुधारणा दिसून आली.
  • महागाई : कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जगभरात अन्नधान्य आणि इंधनाची दरवाढ झाली आहे. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे.

हे युद्ध का झाले?

अमेरिका आणि इराणमधील २०२६ च्या युद्धाची प्रमुख कारणे अणू कार्यक्रमातील तणाव, अंतर्गत मानवी हक्कांचे उल्लंघन आणि भूराजकीय धोरणे यामध्ये दडलेली आहेत. या युद्धाला कारणीभूत महत्त्वाचे मुद्दे...

  • अणू कार्यक्रम : इराणने अणू कार्यक्रम पुन्हा सुरू केला असून ते अमेरिकेवर हल्ला करू शकतील, अशी क्षेपणास्त्रे विकसित करत आहेत, अशी ट्रम्प यांना भीती होती. जानेवारी २०२६ मध्ये इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनात हजारो नागरिक मारले गेले. अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केला. 
  • मुत्सद्देगिरीचे अपयश : फेब्रुवारी २०२६ मध्ये ओमान व जिनिव्हा येथे अणू करारासाठी झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. ट्रम्प यांनी २७ फेब्रुवारीला याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही तासांतच हल्ले सुरू झाले.  इस्रायलने इराणला आपल्या अस्तित्वासाठी धोका मानले होते. 
English
हिंदी सारांश
Web Title : Iran-US-Israel Conflict: Gains and Losses After 39 Days of War

Web Summary : The 39-day war saw significant losses for the US, Iran, and Israel. While the US eliminated key Iranian figures and damaged infrastructure, it faced heavy costs. Iran gained control over Hormuz Strait but suffered infrastructural damage and leadership losses. Israel crippled Iran's nuclear program but sustained casualties and economic setbacks.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलIndiaभारतUSअमेरिका