दहशतवादी हल्ल्यानंतर कुलगुरूंवर कुऱ्हाड
By Admin | Updated: February 1, 2016 02:09 IST2016-02-01T02:09:25+5:302016-02-01T02:09:25+5:30
काही दिवसांपूर्वी बाचा खान विद्यापीठावर झालेल्या तालिबानच्या हल्ल्यामागे सुरक्षाविषयक गंभीर त्रुटी जबाबदार असल्याचे एका चौकशी समितीला आढळून आले

दहशतवादी हल्ल्यानंतर कुलगुरूंवर कुऱ्हाड
इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वी बाचा खान विद्यापीठावर झालेल्या तालिबानच्या हल्ल्यामागे सुरक्षाविषयक गंभीर त्रुटी जबाबदार असल्याचे एका चौकशी समितीला आढळून आले असून विद्यापीठाचे कुलगुरू आणि सुरक्षाप्रमुखांच्या बडतर्फीची शिफारस या समितीने केली आहे.
या घटनेचा तपास करण्यासाठी खैबर पख्तुनख्वाच्या प्रांतिक सरकारने तीन सदस्यीय समिती गठित केली होती. या समितीनेच विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या गंभीर त्रुटींबाबत फजलूर रहीम आणि सुरक्षा प्रभारी अश्फाक अहमद यांना जबाबदार धरून त्यांना हटविण्याची शिफारस केली आहे. (वृत्तसंस्था)