शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

ताल‍िबानच्या धमकीला अमेरिका घाबरली? ज्यो बायडन यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:50 IST

अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारची भेट घेतली होती. मात्र, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले नाही.

वॉशिंग्टन - तालिबानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेने ज्या सैनिकांना अफगाण लोकांना बाहेर काढण्यासाठी पाठविले होते, त्यांनाही 31 ऑगस्टपर्यंत बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला योजना तयार करावी लागेल. यातच, अमेरिकेचे काही सहकारी देश अमेरिकेकडे विनंती करत आहेत, की नागरिकांना बाहेर काढण्याची अंतिम मुदत वाढविण्यात यावी. मात्र, तालिबानच्या धमकीमुळे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन 31 ऑगस्टच्या डेडलाईनवर कायम आहेत. (After Taliban warning Biden begins withdrawing troops from Afghanistan before deadline)

अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारची भेट घेतली होती. मात्र, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले नाही. तत्पूर्वी, अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत आपले सैन्य मागे घ्यावे, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीनने दिली आहे.

अमेरिकेच्या 'या' एका कृतीवर तालिबान भडकला; दिला इशारा 

ऑपरेशन जेवढ्या लवकर पूर्ण करू तेवढे चांगलेच -काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या अमेरिकेचे सुमारे 5,800 सैनिक आहेत. बायडन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे, की "सध्या आपण 31 ऑगस्टपर्यंत सैन्य मागे घेण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. आपण हे ऑपरेशन जेवढ्या लवकर पूर्ण करू तेवढे चांगलेच आहे. या ऑपरेशनमध्ये रोजच्या रोज आपल्या सैनिकांना धोका वढत आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत आपले ऑपरेशन पूर्ण होणे, हे तालिबानच्या सहकार्यावर, लोकांना विमानतळावर येण्याची परवानगी देण्यावर आणि आपल्या अभियानात अडथळा निर्माण न करण्यावर अवलंबून आहे."

अमेरिकेने स्वतःच निर्धारित केलेल्या मुदतीवर ठाम रहावे -अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत आपले सर्व सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. तालिबानने 15 ऑगस्टला अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. यानंतर तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत आपले सैन्य माघारी घेण्याचे अभियान पूर्ण करावे, असा इशाराही दिला होता. तसेच, तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने मंगळवारी काबुलमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे,की अमेरिकेने त्याच्या स्वतःच्या अंतिम मुदतीवर कायम रहावे.

टॅग्स :AmericaअमेरिकाTalibanतालिबानJoe Bidenज्यो बायडनTerrorismदहशतवाद