साठ तासानंतर दोन जण जिवंत
By Admin | Updated: December 24, 2015 00:07 IST2015-12-24T00:07:52+5:302015-12-24T00:07:52+5:30
चीनमधील भूस्खलनाला ६० तास उलटल्यानंतर दोन जण ढिगाऱ्याखाली जिवंत आढळून आले. या घटनेमुळे बचावकार्यातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.

साठ तासानंतर दोन जण जिवंत
बीजिंग : चीनमधील भूस्खलनाला ६० तास उलटल्यानंतर दोन जण ढिगाऱ्याखाली जिवंत आढळून आले. या घटनेमुळे बचावकार्यातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
तियान जेमिंग (वय १९ वर्षे) याला बुधवारी सकाळी साडेसहा वाजता ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर गुआंमिंग न्यू डिस्ट्रिक्ट सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ढिगाऱ्याखाली अडकल्याने तियानचा एक पाय जायबंदी झाला असून तो कापावा लागू नये म्हणून डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. (वृत्तसंस्था)