शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विमानात बिघाड? ‘डिटॅचेबल केबिन सिस्टीम’ने अख्खी प्रवासी केबिनच पॅराशूटने येणार जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:02 IST

युक्रेनियन एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांची २०१६ मध्ये मांडलेली कल्पना पुन्हा चर्चेत

नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर विमान सुरक्षेवरील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चर्चेत युक्रेनियन एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांची २०१६ मध्ये मांडलेली कल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांनी अशा विमानाची रचना सादर केली होती, ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण प्रवासी-केबिन मुख्य विमानापासून वेगळे होऊ शकते आणि पॅराशूटद्वारे सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकते. 

प्रवाशांचा कल्पनेला पाठिंबा 

एका सर्वेक्षणात, ९५% प्रवाशांनी म्हटले की जर अशी तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर ते जास्त पैसे देऊनही तिकीट खरेदी करण्यास प्राधान्य देतील. ही रचना प्रत्यक्षात उतरणार की नाही हे जरी अद्याप निश्चित नाही.

हलक्या वजनाच्या साहित्याचा वापर

केव्हलर आणि कार्बन फायबर सारखे हलके पण खूप मजबूत असणारे साहित्य या डिझाइनमध्ये वापरले जाईल. यामुळे केबिन मजबूत तर होतेच, पण विमानाच्या एकूण उड्डाण क्षमतेवरही परिणाम होत नाही.

उड्डाणाच्या कोणत्याही टप्प्यावर वेगळे होणार?

‘डिटेचेबल केबिन सिस्टीम’ची सर्वांत खास गोष्ट म्हणजे ती विमान प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर म्हणजेच टेकऑफ, मिड-फ्लाइट किंवा लँडिंगच्या वेळीही वेगळी होऊ शकते. विमानापासून वेगळे होताच, मोठे पॅराशूट उघडतील व ते हळूहळू खाली येईल. लँडिंग पाण्यात असल्यास  तरंगण्यास मदत होईल अशी रचना.

विमान उद्योग काय म्हणतो?

विमानाचे वेगळे केलेले केबिन कुठे पडेल? पर्वत, इमारती किंवा जंगलात लँडिंग धोकादायक असू शकते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघात