शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 14:16 IST

हाशिम सफीद्दीन मृत नसराल्लाहचा चुलत भाऊ असून, हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे.

बेरूत : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला (Hezbollah) संघटनेतील संघर्ष तीव्र झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी(दि.27) इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह (Hassan Nasrallah Killed) याचा मृत्यू झाला. शनिवारी हे वृत्त जगभर पसरले. नसरल्लाह हिजबुल्ला शांत होईल, असे वाटत होते. पण, आता संघटनेला नवीन लीडर मिळाला आहे. हसीफ सफीद्दीन (Hashim Safieddin) याला हिजबुल्लाचा म्होरक्या बनवण्यात आले आहे. तो हसन नसराल्लाहचा चुलत भाऊ आहे. हसीफ हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून, त्याचे शिया मुस्लिम चळवळीचे संरक्षक असलेल्या इराणशी खोल धार्मिक आणि कौटुंबिक संबंध आहेत.

सफीद्दीन अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या हिटलिस्टमध्ये युनायटेड स्टेट्स आणि सौदी अरेबियाने 2017 मध्ये सफीद्दीनला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सफीद्दीनचा मुलगा हा इराणी जनरलचा जावई आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या परदेशी ऑपरेशन्स शाखेचा कमांडर जनरल कासिम सुलेमानी याच्या मुलीशी सफीद्दीनच्या मुलाचे लग्न झाले आहे. 2020 मध्ये इराकमध्ये अमेरिकन हल्ल्यात जनरल कासिम मारला गेला. आता हा कट्टरतावादी हिजबुल्लाचा प्रमुख झाला आहे.

हवाई हल्ल्यात नसरल्लाहचा खात्माइस्रायली लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनन्ट कर्नल नादाव शोशानी यांनी एक्सवर पोस्ट करत नसरल्लाहच्या खात्म्याची माहिती दिली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डेव्हिड अव्राहम यांनी सांगितले की, "लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये शुक्रवारी (27 सप्टेंबर 2024) करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुकाचा खात्मा झाला आहे. हसन नसराल्लाहला मारण्यासाठी ऑपरेशन NEW ORDER राबवण्यात आले होते." एवढेच नाही तर, जो कुणी इस्रायलला धमकी देईल, त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी काल हिजुबल्लाहच्या हेडक्वार्टरवर हल्ला केला होता. तेथे हसन नसरल्लाह देखील उपस्थित होता. इस्रायली सैनिक बेरूतसह विविध भागांत सातत्याने हल्ला करत आहे. 

नसरल्लाहची मुलगीही ठार  IDF ने शनिवारी हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याची माहिती दिली होती. तसेच, एक्सवर पोस्ट करत, 'आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत', असे म्हटले आहे. हसन नसरल्ला 32 वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता. या हवाई हल्ल्यात 6 इमारतींना निशाणा बनवण्यात आले होते. ज्यांत नसरल्लाह लपलेला होता. या हल्ल्यात नसरल्लाह शिवाय, मिसाइल युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहकारी हुसेन अहमद इस्माईलही मारला गेला. महत्वाचे म्हणजे, नसरल्लाहची मुलगी जैनब नसरल्लाहदेखील या हल्ल्यात ठार झाली आहे.

अमेरिकेच्या बॉम्बने नसरल्लाहचा खात्माइस्रायलने गाझा आणि लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेच्या भागिदारीने इराण संतापला आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. इराणने म्हटले आहे की, या हल्ल्यात इस्रायलने अमेरिकेने दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. मात्र, आपल्याला या हल्ल्यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नव्हती, असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने या घटनेसाठी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. 

लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराण