इराणमधील घटना घडामोडींनंतर आता येमेनमध्येही सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक १९९० पूर्वीच्या स्वतंत्र 'दक्षिण येमेन' राज्याच्या पुनर्स्थापनेचे स्वप्न घेऊन, विशेषतः अदन शहरात निदर्शने करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आणि सौदी समर्थित सरकारसमोर यामुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
येमेनला अनेक समस्यांचा वेढा -साउदर्न ट्रान्झिशनल कौन्सिलच्या (STC) नेतृत्वाखाली सुरू असलेले हे स्वातंत्र्य आंदोलन, प्रत्यक्षात भीषण वास्तवांना सामोरे जात आहे. देशात सध्या गॅसचा तुटवडा, ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि मोडकळीस आलेली आरोग्य व्यवस्था यामुळे जनता त्रस्त आहे. २०१७ मध्ये यूएईच्या पाठिंब्याने स्थापन झालेली एसटीसी आता दक्षिण भागाला वेगळे राष्ट्र बनवण्याची मागणी करत आहे.
अशी होती १९९० पूर्वीची स्थिती -१९९० मध्ये उत्तर आणि दक्षिण येमेनच्या एकत्रीकरणानंतर दक्षिण भागातील लोकांना आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सतावत आहे. उत्तर भागातील हूती बंडखोरांचे युद्ध आणि आर्थिक संकटाने स्थिती अधिक बिकट झाली आहे. २०२५-२६ मध्ये एसटीसीने दक्षिण भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र जानेवारी २०२६ मध्ये सौदी समर्थित सरकारी दलांनी प्रत्युत्तर देत अदनसह अनेक भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवले. एसटीसीचे नेते एडरूस अल-जुबैदी यूएईला पळून गेले. कौन्सिलने स्वतःला बरखास्त घोषित केले, मात्र तरीही लोकांचा विरोध सुरूच आहे.
हिंसाचारात एकाचा मृत्यू -या निदर्शनांमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गॅसच्या तुटवड्याने वाहतूक आणि स्वयंपाकघरे ठप्प आहेत. रुग्णालयांमध्ये औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. स्वतंत्र दक्षिण येमेनमुळे विकास होईल असा एसटीसी समर्थकांचा दावा आहे. मात्र, सौदी-यूएईमधील स्पर्धा आणि हूतींच्या धोक्यामुळे हे स्वप्न सध्यातरी धूसरच दिसत आहे.
Web Summary : Following Iran, Yemen faces protests demanding a separate 'South Yemen' due to gas shortages, economic crisis, and healthcare collapse. The Southern Transitional Council seeks independence, but faces challenges from the Saudi-backed government and Houthi rebels. Violence has erupted, dimming hopes for a separate nation.
Web Summary : ईरान के बाद, यमन में गैस की कमी, आर्थिक संकट और स्वास्थ्य सेवा के पतन के कारण 'दक्षिण यमन' की मांग को लेकर विरोध प्रदर्शन हो रहे हैं। दक्षिणी संक्रमणकालीन परिषद स्वतंत्रता चाहती है, लेकिन उसे सऊदी समर्थित सरकार और हूती विद्रोहियों से चुनौतियों का सामना करना पड़ता है। हिंसा भड़क उठी है, जिससे एक अलग राष्ट्र की उम्मीदें धूमिल हो गई हैं।