शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 21:38 IST

थायलँड आणि कंबोडिया यांच्यात ८१७ किमी लांब जमिनी सीमा आहे. दोन्ही देशांत शतकाहून अधिक काळ सीमेवरील अनिश्चित रेषेवरून वाद सुरू आहे

बँकॉक - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता आशियात आणखी २ देशांत युद्धाची परिस्थिती तयार झाली आहे. या दोन्ही देशांनी आपापल्या सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले आहे. थायलँड आणि कंबोडिया या दोन्ही देशात तणावाची स्थिती आहे. कंबोडियासोबत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर थायलँडने सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे पूर्व आशियात होणाऱ्या शांततेच्या प्रयत्नांना फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांचेही चीनसोबत द्विपक्षीय संबंध आहेत. सध्या दक्षिण पूर्व आशियात मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम शांततेचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यात यश मिळाले नाही.

थायलँड आणि कंबोडियात तणाव का वाढला?

२८ मे रोजी अनिश्चित सीमा रेषेवर झालेल्या झटापटीत एक कंबोडियन सैनिक मारला गेला तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अनेक दिवसांपासून दोन्ही देशांसोबत दक्षिण पूर्व आशियातील सरकार शांततेचा प्रयत्न करत आहेत. परंतु थायलँडचे उपपंतप्रधान फुमथम वेचायाचाईने यांनी म्हटलं की, कंबोडियाने गुरुवारी द्विपक्षीय चर्चेबाबत आमचा प्रस्ताव फेटाळून लावला. या प्रस्तावामुळे तणाव कमी होऊ शकला असता असं त्यांनी सांगितले.

तसेच कंबोडियाने सीमेवर सैन्य वाढवले आहे त्यातून सीमावाद आणखी वाढला आहे. त्यामुळे थाई सरकारनेही उपाययोजना लागू करत सैन्य मजूबत करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. कंबोडियन सैनिक आणि नागरिक वारंवार थायलँडमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. हा उकसवण्याचा आणि सैन्याचा वापर करण्यास भाग पाडण्याचा प्रकार आहे. कंबोडिया सीमेवरील सर्व थाई चौक्यांवर गस्त वाढवण्यात आली आहे असंही फुमथम यांनी म्हटलं.

दरम्यान, आमची भूमिका संघर्ष सुरू करण्याची नाही तर स्वत:चा बचाव करण्याची आहे. जागतिक कायद्याचे पालन केले जाईल. आमच्या  देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. सशस्त्र बल आक्रमणाविरोधात बचावासाठी तयार आहे असं विधान कंबोडियन पंतप्रधान हुन मानेट यांनी शनिवारी केलेल्या भाषणात केले.

थायलँड आणि कंबोडियात सीमावाद काय?

थायलँड आणि कंबोडिया यांच्यात ८१७ किमी लांब जमिनी सीमा आहे. दोन्ही देशांत शतकाहून अधिक काळ सीमेवरील अनिश्चित रेषेवरून वाद सुरू आहे. ही सीमा पहिल्यांदा १९०७ मध्ये फ्रान्सने नकाशावर रेखाटली होती, जेव्हा कंबोडियात त्यांची वसाहत होती. २००८ मध्येही दोन्ही देशात ११ शतकापासून असलेल्या एका हिंदू मंदिरावरून वाद झाला होता. ज्यामुळे अनेकदा संघर्ष झाला अनेक लोक मारले गेले. २०११ मध्येही एक आठवडा दोन्ही देशात गोळीबार सुरू होता. 

कंबोडिया जागतिक कोर्टाचे दरवाजे ठोठावणार

सीमेवरील ४ हिस्स्यांच्या वादाचा मुद्दा जागतिक कोर्टाकडे नेणार, त्याला थायलँडने सहकार्य करावे असं कंबोडियाने अलीकडे म्हटलं. तर थायलँड न्यायालयाच्या क्षेत्राला मान्यता देत नाही. सीमेबाबत जो वाद असेल तो द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल असं फुमथम यांनी सांगितले. 

टॅग्स :ThailandथायलंडIndiaभारतPakistanपाकिस्तान