शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:45 IST

भारताच्या हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तान बदनाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला करून, आता पाकिस्तानात काहीही आपल्या अवाक्याबाहेर नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने अशा पद्धतीने झोडपून काढल्यानंतर, आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे.

भारताकडे वाकड्या नंजरेनं बघितलं की काय हाल होतात, हे पाकिस्ताननं पुन्हा एकदा बघितलं आहे. भारताच्या हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तान बदनाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला करून, आता पाकिस्तानात काहीही आपल्या अवाक्याबाहेर नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने अशा पद्धतीने झोडपून काढल्यानंतर, आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे. 'शत्रूचा कोणताही डाव पाकिस्तानी सशस्त्र दलांचा संकल्प कमकुवत करू शकत नाही,' असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी म्हटले आहे.

जनरल मुनीर यांनी सोमवारी रावळपिंडीतील कम्बाइंड मिलिटरी हॉस्पिटलला भेट दिली. यादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. भारतासोबत झालेल्या लष्करी चकमकीत जखमी झालेल्या सैनिक आणि नागरिकांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी ते तेथे पोहोचले होते. गेल्या २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरला सुरूवात  केली होती. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले चढवून ते भूईसपाट करण्यात आले.

ऑपरेशन बुनयान उल मरसूसवरही मुनीर यांचं भाष्य -पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर सोमवारी भारतीय हल्ल्यांत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले, संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभा आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन बुनयान उल मरसूसवरही भाष्य केले आणि तो हक्काच्या लढाईचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्येही देशाच्या सशस्त्र दलांचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानी सैन्याची मोठी बदनामी झाली आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत