वर्गमित्राच्या हत्येनंतर मृतदेहासोबत सेल्फी

By Admin | Updated: February 10, 2015 23:03 IST2015-02-10T23:03:58+5:302015-02-10T23:03:58+5:30

शाळकरी मुलाने वर्गमित्राची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढल्याची भयंकर घटना अमेरिकेत घडली. रियान मॅन्गन (१६), असे मृताचे नाव असून

After the assassination of classmates, Selfie with the dead | वर्गमित्राच्या हत्येनंतर मृतदेहासोबत सेल्फी

वर्गमित्राच्या हत्येनंतर मृतदेहासोबत सेल्फी

वॉशिंग्टन : शाळकरी मुलाने वर्गमित्राची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढल्याची भयंकर घटना अमेरिकेत घडली. रियान मॅन्गन (१६), असे मृताचे नाव असून, आरोपी मुलाने रियानच्या चेहऱ्यावर गोळी मारली. जिन्नेट्टे, पेनिसेल्विनिया येथे बुधवारी ही घटना घडली. या घटनेने अमेरिका थरारून गेली आहे.
आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. रियानची त्याच्या घरीच हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या मृतदेहासोबत सेल्फी घेतली आणि एका विशेष मोबाईल अ‍ॅपद्वारे (या अ‍ॅपद्वारे पाठविण्यात आलेले संदेश सेव्ह न केल्यास काही सेकंदांत ते आपोआप डिलीट होतात.) ती दुसऱ्या एका मित्राला पाठविली. आरोपीने ही सेल्फी ज्या मित्राला पाठविली होती. त्याच्या आईने ती तात्काळ सेव्ह करून पोलिसांना त्याविषयी कळविले. आरोपीवर खुनासह शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियानवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: After the assassination of classmates, Selfie with the dead