शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

Afghanistan Taliban Crisis : अमेरिकेच्या विमानात अफगाणी महिलेने जर्मनीत दिला बाळाला जन्म; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 11:08 IST

Afghanistan Taliban Crisis : एका अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात जर्मनीत बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. याच दरम्यान एका अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात जर्मनीत बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. महिलेने अमेरिकेच्या सी -17 ग्लोबमास्टर या विमानामध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. अफगाणिस्तानातून वाचवण्यात आलेल्या इतर नागरिकांसोबत या महिलेला अमेरिकेत नेण्यात येत होतं. एअरबेसवरून जाताना महिलेला विमानात प्रसूती वेदना सुरू झाल्या. 

वैमानिकाने हवेचा दाब वाढल्याने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाच्या जवानांनी जर्मनीतील रामस्टीन विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग होताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विमानातच महिलेची प्रसूती केली. अमेरिकेच्या हवाई दलाने याबाबत ट्विट केलं असून आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती दिली आहे. अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. काबुल विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. 

काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

काबुल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. "अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे" असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-17 विमान आज सकाळी काबुलहून 168 जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायुसेनेकडून घेतली जात आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. 

परिस्थिती गंभीर! Video व्हायरल झालेल्या 'त्या' बाळाचं नेमकं काय झालं?; जाणून घ्या, 'सत्य'

अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकही भावूक झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असाच एक काळजात चर्र करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सैनिकाकडे सोपवलेल्या बाळाचं नेमकं नंतर काय झालं? अशा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता अमेरिकन सैन्याने ते बाळ पुन्हा त्याच्या वडीलांकडे सोपवल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओशी संबंधित माहिती दिली आहे. "काबूल विमानतळावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्याने एका अफगाणी बाळाला तारेच्या कुंपणावरुन घेतले होते. आता त्या बाळाला त्याच्या वडिलांकडे पुन्हा सोपवण्यात आले असून ते विमानतळावर सुरक्षित आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी आता  दिली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिकाpregnant womanगर्भवती महिलाGermanyजर्मनी