शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

Afghanistan Crisis: १,२५० कोटी रुपये घेऊन पळाले अशरफ घनी! अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूनंही घनींसोबत काबुल सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:09 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवताच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबुलमधून पळ काढला. घनी एका विशेष विमानातून तझाकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहोचले होते.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा मिळवताच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबुलमधून पळ काढला. घनी एका विशेष विमानातून तझाकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहोचले होते. पण तेथील सरकारनं त्यांचं विमान उतरविण्यास नकार दिला. मग अफगाणी राष्ट्रपती आपल्या कुटुंबीय आणि एकूण ५१ जणांसोबत संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पोहोचले. यूएई सरकारनंही अशरफ घनी यांना मानवतेच्या आधारावर आश्रय दिल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं आहे. (Afghanistan President Ashraf Ghani Left Kabul with family and Mohammad Nabi for UAE)

अशरफ घनी यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि एनएमए मोहिब देखील यूएईमध्ये आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार घनी यांची पत्नी रुला एफ सद्दाह घनी, मुलगी मरियम आणि मुलगा तारिक घनी देखील त्यांच्यासोबत आहे. घनी एका खासगी विमानानं तब्बल ५१ जणांना सोबत घेऊन यूएईमध्ये पोहोचले आहेत. घनी त्यांच्यासोबत विमानातून तब्बल १६९ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १२५० कोटी रुपये घेऊन पळाले आहेत, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तालिबानची सत्ता आल्यास आपल्या जीवाला धोका आहे म्हणूनच अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

अशरफ घनींनी शेअर केला व्हिडिओअशरफ घनी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी यूएईमध्ये असल्याचं सांगितलं आहे. काबुल सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी स्पष्टीकरण व्हिडिओतून दिलं आहे. अफगाणिस्तानात रक्तरंजित थरार रोखण्यासाठी मी तिथून निघणं योग्य होतं. माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असं अशरफ घनी म्हणाले. दरम्यान, तझाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या राजदूतानं घनींवर केलेल्या आरोपांचंही त्यांनी खंडन केलं. राजकोषातून तब्बल १६९ मिलियन डॉलर घेऊन घनींनी काबुल सोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान