अफगाणिस्तान - पाकिस्तानमध्ये भूकंपाचा कहर
By Admin | Updated: October 26, 2015 21:21 IST2015-10-26T18:12:14+5:302015-10-26T21:21:38+5:30
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे घाबरुन शाळेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थ्यीनींचा मृत्यू झाल्याचे

अफगाणिस्तान - पाकिस्तानमध्ये भूकंपाचा कहर
>ऑनलाइन लोकमत
- अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या भितीने झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थिनींचा मृत्यू.
- पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे आत्तापर्यंत १४७ जणांचा मृत्यू, तर अफगाणिस्तानमध्ये ३३ जणांचा मृत्यू.
काबूल, दि. २६ - अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे घाबरुन शाळेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थ्यीनींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर २५ विद्यार्थ्यींनी जखमी झाल्या आहेत.
अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वताच्या परिसरात ७.७ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतासह पाकिस्तानमधील काही भागात बसले.
भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याने येथील जीवितहानी व वित्तहानी मोठ्याप्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत असून आत्तापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, येथील एका शाळेतील विद्यार्थिनी भूकंपामुळे घाबरुन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थ्यीनींचा मृत्यू झाला. तर २५ जणी जखमी झाल्या. त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या भूकंपाचा फटका पाकिस्तानलाही बसला असून यात मोठ्याप्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत १४७ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
याचबरोवर भारतातही नवी दिल्ली, श्रीनगर, जयपूर, भोपाळ, शिमला, चंदीगड, हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी जवळपास दोन मिनिटे इतका मोठा काळ भूकंपाचे धक्के बसले आहेत. मात्र, भारतात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.