शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Afghanistan Crisis : तालिबानींमुळे व्यापारकोंडी! रोखले व्यापारी मार्ग, अफगाणिस्तानशी तूर्तास आयात-निर्यात व्यवहार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 07:14 IST

Afghanistan Crisis : अफगाणमधील परिस्थितीसंदर्भात भारतीय निर्यात महासंघाने (एफआयईओ) चिंता व्यक्त केली आहे.

काबूल/नवी दिल्ली : तालिबानींनीअफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर त्याचा फटका अनेक देशांना बसला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. पाकिस्तानमार्गे भारतात होणाऱ्या व्यापारावर तालिबानींनी खडा पहारा ठेवला असल्याने व्यापाराची कोंडी झाली असून आयात-निर्यात तूर्तास बंद झाली आहे. अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर सुकामेवा भारतात आयात होत असतो. 

अफगाणमधील परिस्थितीसंदर्भात भारतीय निर्यात महासंघाने (एफआयईओ) चिंता व्यक्त केली आहे. महासंघाचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, ‘अफगाणिस्तानच्या सीमारेषा चारही बाजूंनी जमिनीने वेढल्या आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानमार्गे आयात वा निर्यात करणे अधिक सोयीस्कर ठरत असते. मात्र, अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती पाहता व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. अफगाणिस्तानात सध्या सर्वच स्तरांवर अनिश्चितता आहे.

पाकमार्गे येणाऱ्या वा जाणाऱ्या मालवाहतुकीवर तालिबानींनी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी आयात-निर्यात बंद राहणार आहे. परिणामी, सुकामेवा व मिठाईच्या किमती नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्गाने आपल्या हितरक्षणासाठी सरकारकडून पतहमी घ्यावी, असा सल्लाही सहाय यांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)

गोळीबारात तीन ठार : तालिबानविरोधात अफगाणिस्तानात ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. त्यातच गुरुवारी अफगाणिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांवर तालिबानींनी गोळीबार केला. यावेळी झालेल्या गोंधळात तीन जण ठार झाले. अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज अजून ठरायचा असून सध्याचा ध्वज मान्य नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. 

द्विपक्षीय व्यापार२०१९-२०२० : १.४ अब्ज डॉलर२०२०-२०२१ : १.५२ अब्ज डॉलर

आयात-निर्यात (२०२०-२०२१)८२६ दशलक्ष डॉलर मूल्याची निर्यात५१० दशलक्ष डॉलर मूल्याची आयात 

लोकशाही नाहीचअफगाणिस्तानात लोकशाहीला थारा नसेल. सत्तासंचालनासाठी प्रमुख नेत्यांची एक समिती तयार केली जाईल आणि त्याचे नेतृत्व हैबतुल्ला अखुंदजादा याच्याकडे असेल, असे तालिबानचा वरिष्ठ नेता वहिदुल्ला हाशिमी याने सांगितले.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानbusinessव्यवसाय