शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Afghanistan Crisis: सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी, तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 15:53 IST

Afghanistan Crisis: तालिबानने महिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.

काबुल - अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता तालिबानने आपले कायदे-कानून लागू करण्यास सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसताना दिसत आहे. (Afghanistan Crisis) तालिबाननेमहिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. (ban on wearing tight clothes & Sandals, 10 rules made by Taliban for women, punishment for non-compliance)

तालिबानने महिलांसाठी बनवलेले नियम पुढीलप्रमाणे आहेत. -जवळचा नातेवाईक सोबत असल्याशिवाय महिलांना घराबाहेर पडता येणार नाही-घराबाहेर पडताना महिलांनी बुरखा परिधान करणे अनिवार्य आहे- महिलांच्या येण्याची चाहूल पुरुषांना लागू नये यासाठी महिलांनी हाय हिल्स वापरू नयेत- सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये- ग्राऊंड फ्लोअरवर असणाऱ्या घरांच्या खिडक्यांच्या काचा रंगवलेल्या असल्या पाहिजेत. जेणेकरून घरात राहणाऱ्या महिला दिसरणार नाहीत. - महिलांना फोटो काढण्यास बंदी असेल. तसेच त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रे, पुस्तके आणि घरांमध्ये लावता कामा नयेत- महिला शब्द सुद्धा कुठल्याही जागेच्या नावावरून हटवण्यात यावा- घराच्या बाल्कनीमध्ये तसेच खिडकीमध्ये महिला दिसता कामा नयेत. - महिलांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता कामा नयेत - महिलांनी नेल पेंट लावता कामा नये. तसेच त्यांनी कुटुंबीयांच्या मर्जीशिवाय विवाह करू नये 

नियम न मानल्यास मिळणार अशी शिक्षा तालिबान नियम न पाळल्यास कठोर शिक्षा देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. महिलांसाठी बनवलेले नियम कायदे जर कुणी मोडले तर त्यांना क्रूर शिक्षा मिळू शकते. तालिबानच्या काळात महिलांना सार्वजनिकरीत्या अपमानित करणे तसेच बेदम मारहाण करून त्यांना मृत्यूदंड देणे ह्या शिक्षा सामान्य होत्या. अवैध संबंध असल्यास अशा महिलेला सार्वजनिकरीत्या मृत्यूदंड दिला जातो. टाईट कपडे वापरल्यासही अशीच शिक्षा दिली जाते. तसेच एखादी मुलगी लग्नातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे नाक आणि कान कापून तिला मरण्यासाठी सोडले जाते. तसेच महिलांनी नेल पेंट लावल्यास त्यांची बोटे कापण्याची शिक्षा दिली जाते.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानWomenमहिलाInternationalआंतरराष्ट्रीय