शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानने भारताकडे धरण बांधण्यासाठी मदत मागितली, पाकिस्तानची युद्धाची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 08:50 IST

सध्या पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चांगले संबंध नाहीत. अफगाणिस्तानच्या सीमेवर धुमश्चक्री सुरु असते.

अफगाणिस्तानचे सत्ताधारी तालिबानने चित्राल नदीवर धरण बांधण्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे. याद्वारे ४५ मेगावॉट वीजनिर्मिती केली जाईल आणि ३४ हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येणार आहे. परंतू, स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्यालाही करायला द्यायचे नाही अशा आडमुठ्या पाकिस्तानने यात खोडा घालण्यास सुरवात केली आहे. भारताने मदत केली किंवा धरण बांधले तर युद्धाचे निमंत्रण म्हणून पाहिले जाईल, असा इशारा दिला आहे. 

सध्या पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चांगले संबंध नाहीत. अफगानिस्तानच्या सीमेवर धुमश्चक्री सुरु असते. बलुचिस्तानचे सूचना मंत्री जान अचकजई यांनी अफगानिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानला सहभागी केल्याशिवाय तालिबान यावर धरण बांधत असेल तर दोन देशांमधील युद्धाचे हे पहिले पाऊल असेल असे म्हटले आहे. 

हा बंधारा बांधला गेला तर खैबर पख्तूनख्वातील २० लाख लोकांना पाण्याची टंचाई निर्माण होईल. कारण चित्राल (कुनार) नदीचे पाणी या भागाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर भागविते. अफगाणिस्तानला रोखण्यासाठी पाकिस्तान या कुनार नदीचा प्रवाह वळवू शकते. कुनार नदीचे पाणी काबुल नदीला जाऊन मिळते. काबुलचा एकूण प्रवाह हा २१० करोड़ क्यूबिक मीटर आहे. तर एकट्या कुनारचा 150 करोड़ क्यूबिक मीटर एवढा आहे. ही नदी पाकिस्तानातून प्रवाहित होते आणि अफगानिस्तानात जाते. पाकिस्तान या नदीला खैबरच्या पंजकोरा नदीकडे वळवू शकते. यामुळे अफगानिस्तानात दुष्काळ पडू शकतो. 

यामुळे अफगाणिस्तानचे हात दगडाखाली आहेत. असे असले तरी अफगाणिस्तानने नवाझ शरीफ पंतप्रधान असताना २०१३ मध्ये पाकिस्तानच्या मदतीने कुनार नदीवर 1,200 मेगावाटचा हायड्रोपॉवर प्रोजेक्ट निर्माणासाठी करार केला होता. याची किंमत सुमारे 22,400 कोटी रुपये होती. परंतु, पाकिस्तानने या प्रकल्पाला महत्व न देता दासू धरण बांधण्याकडे लक्ष दिले. हा बंधारा अजूनही सिंधु नदीवर निर्माणाधीन आहे. या कृत्याला अफगाणिस्तान विश्वासघात मानत आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारत